नाशिक

टुडे पान ३ साठी.. अवतीभवती

CD
धुळे : टुडे पान ३ साठी.. अवतीभवती -- सिसोदे विद्यालयात क्रीडा दिन साजरा धुळे : नरडाणा (ता. शिंदखेडा) येथील ग्रामीण विकास शिक्षण प्रसारक मंडळ संचलित भाऊसाहेब कै. एम. डी. सिसोदे कला, वाणिज्य व डॉ. उषाताई प्रसादराव तनपुरे विज्ञान महाविद्यालय आणि आर. एम. सिसोदे कला कनिष्ठ महाविद्यालयात क्रीडा विभागातर्फे राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला. प्राचार्य डॉ. पी. एस. गिरासे यांच्या हस्ते हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. उपप्राचार्य डॉ. यू. जी. पाटील, उपप्राचार्य प्रा. ए. आर. वसावे व उपप्राचार्य प्रा. एस. टी. भामरे उपस्थित होते. प्राचार्य डॉ. गिरासे यांनी निरोगी जीवनशैलीसाठी खेळ आवश्यक असल्याचे सांगितले. क्रीडा संचालक प्रा. एम. पी. नगराळे यांनी मेजर ध्यानचंद यांच्या ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक विजयातील योगदानाविषयी माहिती दिली. कार्यालयीन अधीक्षक आर. ओ. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. राहुल भदाणे, प्रा. गिरीश पवार, प्रा. देवेंद्र पाटील, प्रा. स्वर्णदीप राजपूत, प्रा. स्वप्निल मोरे, संजय बोरसे, शैलेंद्र सिसोदे, शंकर सिसोदे, शशिकांत भामरे आदींनी संयोजन केले. -- धुळ्यात संत सेना महाराज पुण्यतिथी निमित्त सप्ताह धुळे : विठ्ठल रुखमाई सेवा ट्रस्टच्या वतीने देवपूर येथील श्री संतसेना नगर (न्हावी कॉलनी) येथे संत सेना महाराज पुण्यतिथी उत्सवानिमित्त अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. दोन सप्टेंबर ते आठ सप्टेंबर या कालावधीत होत असलेल्या या सोहळ्यात दररोज सकाळी सहा ते सात हरिपाठ आणि रात्री आठ ते दहा या वेळेत कीर्तनकारांचे कीर्तन होणार आहे. सप्ताहात २ सप्टेंबरला नाना महाराज धुळेकर, ३ सप्टेंबरला रामचंद्र महाराज मालपूरकर, ४ सप्टेंबरला दत्तात्रय महाराज वरपाडेकर, ५ सप्टेंबरला आनंद महाराज धुळेकर, ६ सप्टेंबरला अशोक महाराज विखरणकर, ७ सप्टेंबरला प्रमोद महाराज महाले (धुळे) आणि ८ सप्टेंबरला गोकुळ महाराज शिंदे यांचे काल्याचे कीर्तन होईल. ८ सप्टेंबरला दुपारी तीनला पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. या धार्मिक महोत्सवाचा लाभ परिसरातील सर्व भाविकांनी घ्यावा, असे आवाहन प्रमोद महाराज महाले (धुळे) यांनी केले आहे. -- एसआरबी शाळेत गौरव दिन उत्साहात धुळे : दहिवद (ता. शिरपूर) येथील सदाशिवशेठ आर. बाविस्कर इंटरनॅशनल शाळेमध्ये नुकताच भटक्या विमुक्त जमाती गौरव दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये भटक्या विमुक्त जमातींच्या समृद्ध संस्कृती, इतिहास आणि संघर्षाविषयी जाणीव निर्माण करणे हा यामागचा मुख्य उद्देश होता. कार्यक्रमाची सुरुवात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर आणि संत बाळूमामा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने झाली. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा, लोककला, नृत्य व गीते सादर करून उपस्थितांचे लक्षवेधून घेतले. मान्यवरांनी मनोगतामधून भटक्या विमुक्त जाती- जमातींच्या सामाजिक योगदानावर व जीवनसंघर्षावर प्रकाश टाकला. संस्थेच्या अध्यक्षा भाग्यलक्ष्मी बाविस्कर, चेअरमन डॉ. धीरज बाविस्कर, संचालिका मानसी बाविस्कर, अजनाडचे सरपंच नवनाथ ठेलारी, मुख्याध्यापक सुभाषनाथ पटले उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दिल्ली-महाराष्ट्रात कोट्यवधी मतदारांची नावं वगळली; SIR ड्राफ्टमध्ये तुमचं नाव आहे का? कसं चेक करायचं?

Horoscope: जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांची खास स्थिती; ‘या’ ४ राशींचं नशीब अचानक चमकणार? पैसा, करिअरमध्ये प्रगतीसह मोठ्या धनलाभाचे संकेत

जंतर-मंतर CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील FIR मागे घेण्यासाठी सरकारची सुप्रीम कोर्टात धाव; काय आहे अनुच्छेद 142?

Marathi News Live Updates : भारतातील बोगदा बचाव पथकाची नेपाळी लष्करासोबत भागीदारी

‘निपुण’ भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल! खोल समुद्रातील मोहिमा करणार, पाणबुडी बचाव क्षमतेला बळ; पाहा वैशिष्ट्ये

SCROLL FOR NEXT