नाशिक

महापौर दीपमाला काळे यांना

CD
NSK26H28373 जळगाव : महापौर दीपमाला काळे यांना रोटरीचे मानद सदस्यत्व देताना अध्यक्ष ॲड. हेमंत भंगाळे. शेजारी माजी प्रांतपाल राजेंद्र भामरे, अनिल कांकरिया, स्वाती ढाके. -- महापौर दीपमाला काळे यांना रोटरी क्लबचे मानद सदस्यत्व सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १ : रोटरी क्लबच्या सदस्यत्व विस्तार उपक्रमांतर्गत शहराच्या महापौर दीपमाला काळे यांना रोटरी क्लब जळगावचे सन्मानपूर्वक मानद सदस्यत्व नुकतेच प्रदान करण्यात आले. येथील गणपतीनगरातील रोटरी भवनात झालेल्या नवीन सदस्यांच्या स्वागत सोहळ्याप्रसंगी माजी प्रांतपाल राजेंद्र भामरे, सहप्रांतपाल अनिल कांकरिया, अध्यक्ष ॲड. हेमंत भंगाळे, मानद सचिव स्वाती ढाके यांची प्रमुख उपस्थिती होती. या सोहळ्यात महापौरांना मानद सदस्यत्व, तर डॉ. रोनीत पाटील, सिद्धार्थ प्रभुदेसाई व अशोक धूत यांना माजी प्रांतपाल भामरे यांच्या हस्ते रोटरी क्लब जळगावचे अधिकृत सदस्य म्हणून सदस्यत्व प्रदान करण्यात आले. रोटरी सदस्यत्वाची शपथ माजी अध्यक्ष राघवेंद्र काबरा यांनी दिली. महापौर काळे यांनी बोलताना रोटरी परिवारात सहभागी होण्याची मला सुवर्णसंधी लाभली आहे. त्या माध्यमातून स्वच्छ, सुंदर जळगावसाठी रोटरी व महापालिका एकत्र येऊन प्रयत्न करण्याची ग्वाही त्यांनी दिली. डॉ. प्रदीप जोशी यांनी परिचय करून दिला. कॅप्टन मोहन कुलकर्णी यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Russia Relations: भारत-रशिया मैत्री इतकी मजबूत का? रशियन कॉन्सुल जनरल यांनी सांगितले चाणक्यांचे सूत्र

Mohammed Shami Catch: शमीच्या फिटनेसवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या आगरकरने 'हा' कॅच पाहायलाच हवा... Video Viral

भाविकांच्या पिकअपचा भीषण अपघात, रस्त्याकडेला थांबलेल्या ट्रकला धडक; ६ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी

Crime: ५० रुपयाच्या वादातून १८ वर्षीय रिक्षाचालकाची हत्या, तरुण प्रवाशांकडून धारदार शस्त्राने सपासप वार; नवी मुंबईतील खळबळजनक घटना

मुलगा असून रडतोस? असं म्हणणं चुकीचं; करीना कपूरने सांगितलं ती मुलांना कशी वाढवतेय, म्हणते, 'माझ्या मुलाला रडू आलं तर...

SCROLL FOR NEXT