नाशिक

सकाळ कबड्डी प्रीमियर लीगच्‍या जर्सीचे दिमाखात विमोचण

CD
फोटो : H28357 ‘सकाळ कबड्डी प्रीमियर लीग’ जर्सीचे अनावरण विभागीय क्रीडा संकुलात उद्यापासून रंगणार स्‍पर्धेचा थरार सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ३१ : ‘सकाळ’तर्फे आयोजित ‘सकाळ कबड्डी प्रीमियर लीग’ चा काऊंटडाऊन सुरु झाला आहे. सोमवारी (ता. ३१) मान्‍यवर, संघांचे प्रतिनिधी, कर्णधार, खेळाडू व कबड्डी असोसिएशन पदाधिकाऱ्यांच्‍या उपस्‍थितीत स्‍पर्धेतील संघांच्‍या जर्सीचे दिमाखात अनावरण करण्यात आले. बुधवार (ता.२) पासून पंचवटीतील मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुलात या स्‍पर्धेची रंगत बघायला मिळणार आहे. मुंबई नाका येथील कालिका प्‍लाझा येथील ‘सकाळ’ कार्यालयात अनावरण समारंभ पार पडला. याप्रसंगी ‘सकाळ’ उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे निवासी संपादक अभय सुपेकर, सरव्‍यवस्‍थापक संजय पाटील, नाशिक जिल्‍हा कबड्डी असोसिएशनचे पदाधिकारी शरद पाटील, महात्‍मा गांधी विद्यामंदिर संस्‍थेचे उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. हरीश आडके, संस्‍थेचे जनसंपर्क अधिकारी प्रतीक गंगेले, नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या प्राचार्या अनुजा वंजारी, अश्‍वमेध रायडर्स संघाचे मनीष बोरस्‍ते यांच्‍यासह प्रशिक्षक, खेळाडूंपैकी प्रशिक्षक किशोर राजगुरु, कुशल लाड, दादासाहेब देशमुख, ओंकार पाटील, विजय ढिकले, स्‍वयंम माळोदे, यश निरभवणे, प्रसाद मते, प्रतीक जगताप, अंकित जाधव, ओमकार पोकळे आदी उपस्‍थित होते. बागड प्रॉपर्टीज्‌चे अजिंक्‍य बागड, व संकेत बागड यांनीही सदिच्‍छा भेट देताना खेळाडूंना शुभेच्‍छा दिल्‍या. प्रास्‍ताविकात अभय सुपेकर म्‍हणाले, ‘सकाळ’च्‍या माध्यमातून ‘यिन’सह इतर विविध व्‍यासपीठाच्‍या माध्यमातून कला, गुणांना वाव दिला जातो आहे. यापूर्वी कबड्डी खेळात नाशिकहून अनेक राष्ट्रीय खेळाडू घडले आहेत. युवा खेळाडूंना प्रोत्‍साहन देण्याच्‍या उद्देशाने ही स्‍पर्धा आयोजित केली आहे. प्राचार्य डॉ. हरीश आडके म्‍हणाले, की ही स्‍पर्धा अनेक दृष्टिकोनातून महत्त्वाची ठरणार आहे. ‘सकाळ’ने चांगला उपक्रम हाती घेतला असून, आगामी काळात या स्‍पर्धेतून अनेक चांगले खेळाडू पुढे येतील, असा विश्‍वास व्‍यक्‍त केला. ------------चौकट क्रीडाप्रेमींना प्रवेश खुला चार दिवस चालणाऱ्या या स्‍पर्धेचा उद्‌घाटन समारंभ बुधवारी (ता. २) दुपारी तीन मान्‍यवरांच्‍या उपस्‍थितीत होणार आहे. या कार्यक्रमात सर्व संघांचे खेळाडू संचलन करतील. यासोबत मान्‍यवरांची सलामी स्वीकारून सामन्‍यांना सुरुवात होणार आहे. चुरशीचे सामने पाहण्यासाठी क्रीडाप्रेमींनी स्‍पर्धास्‍थळी उपस्‍थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. या स्‍पर्धेसाठी फ्रावशी ग्रुप ऑफ स्‍कूल्स, सिंग वॉरीयर्स, जेम्‍स इंग्‍लिश मीडियम स्‍कूल, निशम डेव्‍हलपर्स, बागड प्रॉपर्टीज्‌, एसएमबीटी हॉस्‍पिटल, मराठा विद्या प्रसारक समाज संस्‍था आणि हिरे ॲकॅडमी यांचे मोलाचे सहकार्य लाभते आहे. स्पर्धेतील सामान्याचा क्रीडाप्रेमी व प्रेक्षकांना प्रवेश खुला असून, आनंद घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. ----

कुख्यात ड्रग्स तस्कर अमजद पठाणच्या मुलाचं भयंकर कृत्य, विद्यार्थ्यावर थेट तलवारीने वार; कल्याणमधील नामांकित कॉलेजजवळ रक्तरंजित थरार

जंतर-मंतर CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील FIR मागे घेण्यासाठी सरकारची सुप्रीम कोर्टात धाव; काय आहे अनुच्छेद 142?

Local Time Table : पश्चिम रेल्वेवर उद्यापासून लोकलचे नवीन वेळापत्रक; सहा नवीन फेऱ्या, एसी लोकलची संख्या १४७

Marathi News Live Updates : जयपूर परीक्षा केंद्रावरील वीजपुरवठा खंडित झाल्याबाबत TCS iON चे निवेदन

Velhe News : खासदार नीलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली शेकडो सहकाऱ्यांसह राजगडावर श्रमदान

SCROLL FOR NEXT