नाशिक

वन विभागाची गस्त

CD
धुळे ः टुडे २ साठी, मेन -- फोटो क्रमांक ः 28370 धुळे : पोलिस अधीक्षक कार्यालयात जिल्हास्तरीय व्याघ्र कक्ष समितीच्या मासिक बैठकीत बोलताना पोलिस अधीक्षक विशाल आनंद. समोर उपस्थित अधिकारी. -- वन्यजीव संरक्षणार्थ पोलिस, वन विभागाची गस्त - अवैध शिकारी, तस्करीला आळा घालण्याचा निर्णय; संघर्ष रोखण्यासाठी कृती आराखडा सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. ३१ : बिबट्या, वाघांसह इतर वन्यजीवांचे संरक्षण, अवैध शिकारी व वन्यजीवांच्या अवयवांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी पोलिस आणि वन विभाग संयुक्तपणे कारवाई करणार आहे. मानव- वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी तातडीच्या उपाययोजना करण्यात येणार असून, जिल्हा पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांच्या अध्यक्षतेत पार पडलेल्या जिल्हास्तरीय व्याघ्र कक्ष समितीच्या मासिक बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा करून प्रभावी कृती आराखडा निश्चित करण्यात आला. - उपवनसंरक्षक एम. बी. नाईकवाडी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, निसर्गमित्र राज पाटील, तेजस पोतदार, महावितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता सौरभ शर्मा, हवालदार चेतन बोरसे, विनायक सूर्यवंशी यांच्यासह पोलिस, वन विभाग व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. पौर्णिमेच्या काळात वनक्षेत्र आणि संशयास्पद मार्गांवर संयुक्त गस्त, नाकाबंदी व वाहन तपासणी करण्याचे ठरले. तसेच वन विभागातील क्षेत्रीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना गरजेनुसार पोलिस दलाकडून शस्त्र प्रशिक्षण दिले जाणार असून, वनक्षेत्रातील बेकायदेशीर अतिक्रमणांवरही कठोर कारवाई केली जाईल. - बेकायदेशीर प्रकारांवर चाप वन्यप्राण्यांचा मानवी वस्तीत वाढता वावर लक्षात घेऊन संघर्ष टाळण्यासाठी उपाययोजना करण्यावर बैठकीत विशेष भर देण्यात आला. धुळे शहर व परिसरात काळवीट तसेच इतर वन्यप्राण्यांच्या मांसाची बेकायदेशीर विक्री करणाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. लळींग परिसरात एअरगनच्या सहाय्याने वन्यप्राण्यांची शिकार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयितांचा शोध घेऊन कडक कारवाई निश्चित करण्यात आली आहे. - जनजागृतीवर भर शिरपूर परिसरातील वनक्षेत्रात होणाऱ्या गांजा लागवडीला आळा घालण्यासाठी संयुक्त मोहीम राबवली जाणार आहे. सर्पमित्रांकडून होणारे बेकायदेशीर सर्पप्रयोग व प्रदर्शन रोखण्यासाठी पोलिसांच्या मदतीने कायदेशीर निर्देश देण्यात आले आहेत. अवैध शिकार आणि गांजा लागवडीची माहिती तातडीने मिळवण्यासाठी पोलिस पाटील, ग्राम सुरक्षा दल आणि स्थानिक नागरिकांच्या सहभागातून माहिती संकलन व जनजागृती केली जाणार आहे. तसेच, महामार्ग व वनक्षेत्रातील रस्त्यांवर वन्यप्राण्यांच्या सुरक्षेसाठी भुयारी मार्ग व सूचना फलक उभारण्याबाबत संबंधित कंत्राटदारांना सूचना देण्याचे ठरले आहे. -

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दिल्ली-महाराष्ट्रात कोट्यवधी मतदारांची नावं वगळली; SIR ड्राफ्टमध्ये तुमचं नाव आहे का? कसं चेक करायचं?

Horoscope: जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांची खास स्थिती; ‘या’ ४ राशींचं नशीब अचानक चमकणार? पैसा, करिअरमध्ये प्रगतीसह मोठ्या धनलाभाचे संकेत

जंतर-मंतर CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील FIR मागे घेण्यासाठी सरकारची सुप्रीम कोर्टात धाव; काय आहे अनुच्छेद 142?

Marathi News Live Updates : भारतातील बोगदा बचाव पथकाची नेपाळी लष्करासोबत भागीदारी

‘निपुण’ भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल! खोल समुद्रातील मोहिमा करणार, पाणबुडी बचाव क्षमतेला बळ; पाहा वैशिष्ट्ये

SCROLL FOR NEXT