नाशिक

साक्रीत उपोषण मागे

CD
धुळे : टुडे पान ३ साठी.. मेन -- फोटो क्रमांक : 28376 साक्री : तालुक्यातील खड्डेमय व दयनीय झालेल्या रस्त्यांच्या तातडीने दुरुस्तीच्या मागणीसाठी उपोषण करणाऱ्या युवराज तोरवणे यांना लिंबू पाणी देत उपोषण सोडवताना तहसीलदार साहेबराव सोनवणे, भाजपचे सुरेश पाटील यांच्यासह बांधकाम विभागाचे आधींकरी, पोलिस आदी. शेजारी पदाधिकारी. -- लेखी आश्वासनानंतर साक्रीत उपोषण स्थगित -- तहसीलदार कार्यालयासमोर तीन दिवस उपोषण; २२ आंदोलकांचे जेलभरो आंदोलन सकाळ वृत्तसेवा साक्री, ता. ३१ : तालुक्यातील खड्डेमय व दयनीय झालेल्या रस्त्यांच्या तातडीने दुरुस्तीच्या मागणीसाठी गेल्या तीन दिवसांपासून तहसील कार्यालयासमोर युवराज तोरवणे यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या बेमुदत उपोषणाला नागरिकांचा प्रतिसाद मिळाला. उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी आंदोलकांनी आक्रमक होत सामूहिक जेलभरो आंदोलन केले. अखेर बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रस्ते दुरुस्तीबाबत ठोस लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक रस्त्यांची अवस्था अतिशय दयनीय आणि खड्डेमय झाली असून नागरिक, विद्यार्थी, शेतकरी व वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या मार्गांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण पुकारण्यात आले होते. आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशीही विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि सर्वसामान्य नागरिकांनी पस्थित राहून पाठिंबा दर्शविला. दरम्यान, ठोस निर्णय होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी ठाम भूमिका उपोषणकर्त्यांनी घेतली होती. या चर्चेसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता विनोद भदाणे, साक्री पंचायत समितीचे उपअभियंता महेंद्र खामकर, प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे उपअभियंता येळाई, तहसीलदार साहेबराव सोनवणे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर पाटील आणि भाजपचे नेते सुरेश पाटील यांच्यासह अनेक अधिकारी व मान्यवर उपस्थित होते. युवराज तोरवणे यांनी संबंधित अभियंत्यांशी चर्चा करून रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत स्पष्ट व लेखी आश्वासन देण्याची मागणी लावून धरली होती. - तिसऱ्या दिवशी जेलभरो या आंदोलनाचा राजकीय स्वार्थासाठी किंवा विरोधासाठी गैरवापर होऊ नये, कोणीही राजकीय पोळी शेकून घेऊ नये, यासाठी युवराज तोरवणे यांनी विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना आंदोलनस्थळी येण्याचे टाळण्याचे आवाहन केले होते. हे आंदोलन कोणत्याही राजकीय हेतूने प्रेरित नसून केवळ सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी आणि तालुक्यातील रस्त्यांच्या गंभीर प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सोमवारी (ता. ३१) दुपारी बाराच्या सुमारास ॲड. तोरवणे यांच्या नेतृत्वात उपोषणकर्त्यांनी तहसील कार्यालय परिसरातून साक्री पोलिस ठाण्याकडे मोर्चा काढून जेलभरो आंदोलन केले. यामध्ये २२ आंदोलक स्वेच्छेने सहभागी झाले आणि पोलिस ठाण्यात जाऊन अटक घेत आपल्या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. आंदोलन स्थळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. - आश्वासनानंतर उपोषण मागे तिसऱ्या दिवशी बांधकाम विभागाने सर्व मागण्यांसंदर्भात लेखी आश्वासन दिले. त्यानुसार मंजूर कामे व बेहेडचे काँक्रिटीकरण ४५ दिवसांत पूर्ण करण्याचे आश्वासन मिळाले. तसेच, नव्याने मंजूर होणाऱ्या रस्त्यांची कामे मार्गी लावण्यासाठी पालकमंत्री जयकुमार रावल स्वतंत्र बैठक घेऊन योग्य त्या सूचना देणार असल्याची माहिती श्री. तोरवणे यांनी दिली. या आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दिल्ली-महाराष्ट्रात कोट्यवधी मतदारांची नावं वगळली; SIR ड्राफ्टमध्ये तुमचं नाव आहे का? कसं चेक करायचं?

Horoscope: जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांची खास स्थिती; ‘या’ ४ राशींचं नशीब अचानक चमकणार? पैसा, करिअरमध्ये प्रगतीसह मोठ्या धनलाभाचे संकेत

जंतर-मंतर CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील FIR मागे घेण्यासाठी सरकारची सुप्रीम कोर्टात धाव; काय आहे अनुच्छेद 142?

Marathi News Live Updates : भारतातील बोगदा बचाव पथकाची नेपाळी लष्करासोबत भागीदारी

‘निपुण’ भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल! खोल समुद्रातील मोहिमा करणार, पाणबुडी बचाव क्षमतेला बळ; पाहा वैशिष्ट्ये

SCROLL FOR NEXT