नाशिक

गुणवत्तेसाठी पाल्यांवर दबाव टाकू नका

CD
NSK26H28381 जळगाव : गुणवंत पाल्य व ज्येष्ठ सदस्यांचा गौरवप्रसंगी बोलताना कुलगुरू डॉ. व्‍ही. एल. माहेश्वरी. शेजारी डॉ. योगेश पाटील, पतपेढीचे अध्यक्ष अरुण सपकाळे, उपाध्यक्ष संजय ठाकरे आदी. -------- गुणवत्तेसाठी पाल्यांवर दबाव टाकू नका ----- कुलगुरु माहेश्वरी : विद्यापीठात गुणवंत पाल्यासह ज्येष्ठ सदस्यांचा गौरव सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १ : मुलांनी उत्तम गुण मिळवावेत, या अपेक्षेने पालकांनी त्यांच्यावर अतिरिक्त दबाव टाकू नये. प्रत्येक मुलामध्ये वेगवेगळ्या क्षमता व बलस्थाने असतात. त्यामुळे त्यांच्या आवडीचे क्षेत्र ओळखून त्यांना त्या क्षेत्रात शिक्षण घेण्याची मुक्त संधी द्यावी, असे प्रतिपादन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांनी केले. विद्यापीठातील कर्मचाऱ्यांची सहकारी पतपेढीची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी (ता.३०) झाली, त्यावेळी कुलगुरु माहेश्वरी यांनी जीवनातील यशासाठी काही महत्त्वपूर्ण सूत्रे सांगितली. या कार्यक्रमास परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. योगेश पाटील, पतपेढीचे अध्यक्ष अरुण सपकाळे, उपाध्यक्ष संजय ठाकरे, सचिव डॉ. अनिल लोहार, संचालक मंडळातील डॉ. महेंद्र महाजन, राजू सोनवणे, डॉ. सोमनाथ वडनेरे, जयश्री देशमुख, दीपक गावीत, विकास बिऱ्हाडे आदी उपस्थित होते. यावेळी कुलगुरू माहेश्‍वरी यांच्‍या हस्‍ते गुणवंत पाल्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. आपल्या चुकांची पुनरावृत्ती करू नका, स्वतःची बलस्थाने ओळखा व त्यानुसार स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवा, असा सल्लाही कुलगुरू माहेश्‍वरी यांनी दिला. आयुष्यात चांगल्या मित्रांचे नेटवर्क निर्माण करावे. संकटाच्या काळात योग्य मित्र परिवाराचे सहकार्य मोलाचे ठरते. पालकांनी मुलांच्या शिक्षणाबरोबरच त्यांच्या सकस व संतुलित आहाराकडेही लक्ष द्यावे. मुलांच्या आवडी व क्षमतांचा विचार करून त्यांना शिक्षणाची दिशा दिल्यास त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होईल, असेही कुलगुरू माहेश्‍वरी यांनी नमूद केले.

India Russia Relations: भारत-रशिया मैत्री इतकी मजबूत का? रशियन कॉन्सुल जनरल यांनी सांगितले चाणक्यांचे सूत्र

Mohammed Shami Catch: शमीच्या फिटनेसवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या आगरकरने 'हा' कॅच पाहायलाच हवा... Video Viral

भाविकांच्या पिकअपचा भीषण अपघात, रस्त्याकडेला थांबलेल्या ट्रकला धडक; ६ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी

Crime: ५० रुपयाच्या वादातून १८ वर्षीय रिक्षाचालकाची हत्या, तरुण प्रवाशांकडून धारदार शस्त्राने सपासप वार; नवी मुंबईतील खळबळजनक घटना

मुलगा असून रडतोस? असं म्हणणं चुकीचं; करीना कपूरने सांगितलं ती मुलांना कशी वाढवतेय, म्हणते, 'माझ्या मुलाला रडू आलं तर...

SCROLL FOR NEXT