नाशिक

त्र्यंबकेश्वर तिसरा श्रावण सोमवार

CD
पान-१ साठी ---------------- फोटो आहेत. NSK26H28396 त्र्यंबकेश्वर ः श्री त्र्यंबकेश्वराची कुशावर्तावर स्नानासाठी काढण्यात आलेली पालखी मिरवणूक. ----------- NSK26H28404 त्र्यंबकेश्वर ः तिसऱ्या श्रावण सोमवारनिमित्त फेरीसाठी आलेल्या भाविकांनी फुलून गेलेल्या शहरातील गल्ल्या. --------- NSK26H28405 त्र्यंबकेश्वर ः फेरीत सहभागी झालेले आबालवृद्ध. ------- ३०-२ ‘बम भोले’ने ब्रह्मगिरी दुमदुमली; तीन लाख भाविकांची प्रदक्षिणा, मंदिरे भाविकांनी गजबजली ------------------- सकाळ वृत्तसेवा त्र्यंबकेश्वर, ता.३१ : ‘बम भोले’, ''हर हर महादेव''च्या जयघोषात सुमारे तीन लाख भाविकांनी ब्रह्मगिरी पर्वताला प्रदक्षिणा घातली. तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त रविवारी सायंकाळपासूनच त्र्यंबकेश्वर नगरीत भाविकांची अलोट गर्दी जमली होती. नाशिकहून एसटी महामंडळाच्या बसद्वारे भाविक जव्हार फाट्यापर्यंत पोहोचत होते. खासगी वाहने खंबाळे, अंबोली व पहिणे येथील तात्पुरत्या पार्किंगमध्ये लावून तेथून बसने भाविकांना त्र्यंबकेश्वरला आणले जात होते. कुशावर्त तीर्थावर स्नान करून भाविक मेनरोड, पेगलवाडी, पहिणेबारी, तळेगाव, सापगाव आणि गणपतीबारी मार्गाने प्रदक्षिणा पूर्ण करत होते. मार्गावर विविध संस्था व समाजसेवकांकडून फराळ, चहापाणी आणि फळांचे वाटप करण्यात आले. यंदा प्रदक्षिणेत महिलांची संख्या लक्षणीय होती. गर्दीवर नियंत्रणासाठी पोलिसांनी बॅरिकेटिंग लावून टप्प्याटप्प्याने भाविकांना पुढे सोडण्याची योजना आखली, ज्यामुळे कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. सोमवारी दुपारी तीनला त्र्यंबकराजाची पालखी कुशावर्त तीर्थावर स्नानासाठी नेण्यात आली. दिवसभर ब्रह्मगिरी पर्वतावर आणि ज्योतिर्लिंग दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. शहरांतील अन्य शिवमंदिरेही भाविकांनी गजबजली होती. ----------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दिल्ली-महाराष्ट्रात कोट्यवधी मतदारांची नावं वगळली; SIR ड्राफ्टमध्ये तुमचं नाव आहे का? कसं चेक करायचं?

Horoscope: जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांची खास स्थिती; ‘या’ ४ राशींचं नशीब अचानक चमकणार? पैसा, करिअरमध्ये प्रगतीसह मोठ्या धनलाभाचे संकेत

जंतर-मंतर CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील FIR मागे घेण्यासाठी सरकारची सुप्रीम कोर्टात धाव; काय आहे अनुच्छेद 142?

Marathi News Live Updates : पंतप्रधान मोदी आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांच्या भेटीदरम्यान आम्ही खलाशांचा मुद्दा उपस्थित केला

‘निपुण’ भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल! खोल समुद्रातील मोहिमा करणार, पाणबुडी बचाव क्षमतेला बळ; पाहा वैशिष्ट्ये

SCROLL FOR NEXT