नाशिक

महिला बचत गटांच्या अन्न दालनाला पसंती

CD
२८४०८ नाशिक : सिंहस्थ महाकुंभ भक्ती संगम अंतर्गत महिला बचत गटांच्या खाद्यपदार्थ विक्री दालनाला भेट दिल्यानंतर महापौर हिमगौरी आडके, कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, महापालिका आयुक्त मनीषा खत्री, उपआयुक्त सुवर्णा दखणे आदी. महिला बचत गटांच्या अन्न दालनाला नाशिककरांची पसंती सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १ : सिंहस्थ महाकुंभ भक्ती संगम कार्यक्रमा निमित्त नाशिक महापालिकेच्या राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत शहरातील २० स्वयंसहायता महिला बचत गटांनी उभारलेल्या खाद्यपदार्थ विक्री दालनाला नागरिक व भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमात विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या संकल्पनेतून, कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांच्या निर्देशानुसार आणि जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या पुढाकाराने बचत गटांसाठी विशेष विक्री दालनाची व्यवस्था करण्यात आली होती. महापौर हिमगौरी आहेर-आडके, उपमहापौर विलास शिंदे, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप, आयुक्त मनीषा खत्री, अतिरिक्त आयुक्त अमित रंजन आणि उपआयुक्त सुवर्णा दखणे यांच्या समन्वयाने हा उपक्रम राबविण्यात आला. महिला बचत गटांनी सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत सलग तीन दिवस स्वच्छ, सुरक्षित आणि ताज्या अन्नपदार्थांची मेजवानी दिली. महापौर आडके आणि आयुक्त खत्री यांनी प्रत्येक दालनाला भेट देऊन उत्पादनांची पाहणी करीत महिलांचे कौतुक केले. या यशस्वी नियोजनामागे शहर अभियान व्यवस्थापक संदीप भोसले, संतोष निकम, रंजना शिंदे, पल्लवी वक्ते आणि समुदाय संघटक तुषार बोरसे, संदीप कोठेकर, विशाल पाटील, सुनीता कुमावत, संगीता इंगळे, पल्लवी श्रीमाळी, सोनी सोनसळे, विजया चौधरी आणि गोदाई शहर स्तर संघाच्या अध्यक्षा यामिनी मोरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IMD Weather Alert : चक्रीवादळाने रौद्ररूप धरले! ताशी १०० किमी वेगाने सुटणार सोसाट्याचा वारा; 'या' राज्यांत मुसळधार पाऊस, महाराष्ट्रात काय घडणार?

फ्लिपकार्टच्या गोदामातून ९८० सॅमसंग मोबाईल चोरीला; पुरावा मिळू नये म्हणून CCTV चा डीव्हीआरही पळवला...

Jamgaon News: रविवारी सुट्टी असतानाही सीईओंची जामगावला भेट; अपघातात मृत सेविकेच्या कुटुंबीयांचे सांत्वन

IND W VS ZIM W 2ND ODI NEWS: हरमनप्रीत दीप्तीची शतके, वैष्णवीची गोलंदाजीत कमाल! झिम्बाब्वेला लोळवत भारताने मालिका खिशात घातली

Dutch Farmers: डच ट्रॅक्टर रस्त्यावर, मागणी संसदेच्या टेबलावर; नायट्रोजन संघर्षाची सात वर्षे; २०३५चे लक्ष्य ठरले, पण डच शेतकऱ्यांना हवी आहे स्पष्टता

SCROLL FOR NEXT