नाशिक

रस्ते खोदकामासाठी नकार

CD
टूडे साठी ------------ खोदकामासाठी ‘एमएनजीएल’ला नकार आयुक्त खत्री : गणेशोत्सवानंतरच मिळणार परवानगी सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ३१ : सिंहस्थाच्या कामांमुळे आणि एमएनजीएलच्या खोदकामामुळे शहरातील रस्त्यांची दुरवस्था पाहता, आता आणखी खोदकामाला परवानगी न देण्याचा आक्रमक पवित्रा महापालिका आयुक्त मनिषा खत्री यांनी घेतला आहे. दोन लाख गॅस कनेक्शनसाठी १०३ किलोमीटर रस्ते फोडण्याची परवानगी एमएनजीएलने मागितली असता, गणेशोत्सवापर्यंत कोणतेही खोदकाम करू नये आणि रस्ते फोडण्यापूर्वी जीएसआय मॅप सादर करावा, असे स्पष्ट आदेश आयुक्तांनी दिले आहेत. महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडकडून शहरात घरोघरी गॅस कनेक्शन देण्यासाठी खोदकाम सुरू आहे. दुसरीकडे रस्ते कामांसाठी खोदकाम सुरु आहे. त्याचा नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याने प्रशासनावर नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे. महासभेतदेखील खड्ड्यांवरून नगरसेवकांनी संताप व्यक्त केला. खड्ड्यांना एमएनजीएल जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला. शहरात भूमिगत गॅस पाइपलाइनसाठी एकूण ७४० किलोमीटरची अधिकृत मंजुरी आहे. त्यापैकी ६४० किलोमीटरचे काम पूर्ण झाले असून सुमारे १०० किलोमीटरचे काम बाकी असल्याचे कंपनीने स्पष्ट केले होते. त्यानंतर महापालिकेने रस्ते पूर्ववत करण्यापूर्वीच पाइपलाइनचे काम पूर्ण करण्याचे आणि जीएसआय मॅपिंग सादर करण्याचे निर्देश दिले. दरम्यान, आतापर्यंत शहरात ४७ हजार घरांना गॅस कनेक्शन देण्यात आले आहे. कंपनीने महापालिकेला विनंती केली आहे की, रस्ता क्रॉसिंगच्या ठिकाणी केवळ ३ किलोमीटर खोदकामाची परवानगी दिल्यास आणखी १ लाख कनेक्शन देता येतील, तर उर्वरित १ लाख कनेक्शनसाठी १०० किलोमीटर खोदकामाची गरज आहे. अशाप्रकारे एकूण २ लाख कनेक्शनसाठी १०३ किलोमीटर खोदकामाची परवानगी मागितली आहे. मात्र, शहरातील रस्त्यांची स्थिती पाहता सध्या कोणतीही परवानगी देता येणार नाही, गणेशोत्सव संपल्यानंतरच विचार केला जाईल, अशी ठाम भूमिका आयुक्त खत्री यांनी घेतली आहे. ----------------------

फेक नॅरेटिव्हचा आरोप, राहुल गांधींवर निशाणा अन् CJPचा नवा अर्थ; फडणवीसांच्या भाषणात काय काय?

Hockey: भारत आठव्या स्थानावर राहिल्याने हॉकी इंडियाचे अध्यक्ष नाराज; विश्वचषकातील कामगिरीवर दिलीप तिर्की म्हणाले, “मीही खूश नाही”

Railway Reservation : गणपतीसाठी १.१७ लाख प्रवाशांचे आरक्षण पूर्ण; मध्य रेल्वेच्या २६२ विशेष गाड्या, सावंतवाडी रोडसाठी सर्वाधिक ११२ सेवा

कुख्यात ड्रग्स तस्कर अमजद पठाणच्या मुलाचं भयंकर कृत्य, विद्यार्थ्यावर थेट तलवारीने वार; कल्याणमधील नामांकित कॉलेजजवळ रक्तरंजित थरार

जंतर-मंतर CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील FIR मागे घेण्यासाठी सरकारची सुप्रीम कोर्टात धाव; काय आहे अनुच्छेद 142?

SCROLL FOR NEXT