नाशिक

मतदारांची यादी प्रसिद्ध

CD
धुळे ः टुडे १ साठी, ॲंकर -- धुळे जिल्ह्यात पंधरा लाखांवर मतदारांची प्रारूप यादी प्रसिद्ध - तीस सप्टेंबरपर्यंत दावे, हरकती नोंदवाव्यात; जिल्हाधिकारी विसपुते यांचे मतदारांना आवाहन - सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. ३१ : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी सोमवारी (ता. ३१) जाहीर करण्यात आली. या प्रारूप यादीत जिल्ह्यात एकूण १५ लाख ४० हजार २६८ मतदारांची नोंद झाली आहे. नागरिकांनी आपली नावे व तपशील मतदार यादीत तपासून घ्यावेत आणि नाव नसल्यास किंवा दुरुस्ती असल्यास ३० सप्टेंबरपर्यंत दावे व हरकती नोंदवाव्यात, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी केले आहे. - आयोगाच्या वेळापत्रकानुसार २४ ऑगस्टला मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण व पुनर्रचना पूर्ण झाल्यानंतर, ३१ ऑगस्टला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. आता ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर या कालावधीत नागरिकांकडून दावे व हरकती स्वीकारल्या जातील. यावर ३१ ऑगस्ट ते २९ ऑक्टोबरदरम्यान आवश्यक कार्यवाही करून निर्णय घेतला जाईल, तर आगामी ४ नोव्हेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. संबधित मतदान केंद्र, तहसीलदार तथा सहायक मतदार नोंदणी अधिकारी कार्यालय आणि मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयांमध्ये ही प्रारूप यादी पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यातील मान्यताप्राप्त राजकीय पक्षांनाही याची मुद्रित व संगणकीय प्रत देण्यात आली आहे. - ‘हे’ मतदार बाहेर विशेष सखोल पुनरीक्षणादरम्यान ज्या मतदारांची गणनापत्रके मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडे जमा झाली नाहीत, अशा दोन लाख ९४ हजार ८९३ मतदारांचा समावेश सध्याच्या प्रारूप यादीत करण्यात आलेला नाही. वगळण्यात आलेल्यांची कारणे आणि प्रमाण असे : मृत- ५६ हजार ६९८, गैरहजर- ४७ हजार १०, कायमस्वरूपी स्थलांतरित- एक लाख ३५ हजार ८६२, इतर कारणे- एक हजार १९३, यापूर्वीच नोंदणी झालेले (दुबार)- ५४ हजार १३०. संभाव्य कारणे नमूद करून ही यादी स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यालये, तहसीलदार कार्यालये आणि जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. - नावे व आक्षेप प्रारूप यादीत नाव नसलेल्या नागरिकांना किंवा १ ऑक्टोबर २०२६ पर्यंत वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या नवमतदारांना विहित नमुन्यात अर्ज करून नाव नोंदविण्याची संधी आहे. ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर या कालावधीत संबंधित मतदान केंद्र अधिकारी, सहायक मतदार नोंदणी अधिकारी किंवा मतदार नोंदणी अधिकारी यांच्याकडे अर्ज सादर करता येईल. ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधाही उपलब्ध आहे. एखाद्याचे नाव वगळण्यासाठी सामूहिक अर्ज चालणार नाही; प्रत्येक व्यक्तीसाठी स्वतंत्र अर्ज करावा लागेल. तसेच संबंधिताशी नाते आणि नाव वगळण्याचे ठोस कारण नमूद करणे बंधनकारक आहे. चुकीची घोषणा किंवा विधान केल्यास लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५० च्या तरतुदींनुसार कायदेशीर कारवाई व शिक्षेची तरतूद आहे, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. पात्र नागरिकांनी वेळेत आपले नाव तपासून सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. - १४-१ ...चौकट... १४-१ जिल्ह्यात मतदार संख्या प्रारूप यादीनुसार : १५, ४०, २६८ पुरुष : ७ लाख ९१ हजार ३३८ महिला : ७ लाख ४८ हजार ८७९ तृतीयपंथी : ५१ --- विधानसभा मतदारसंघनिहाय साक्री : ३ लाख ३५ हजार ५६३ धुळे ग्रामीण : ३ लाख ५४ हजार ७११ धुळे शहर : २ लाख ६३ हजार ८०० शिंदखेडा : २ लाख ७८ हजार ९५८ शिरपूर : ३ लाख ७ हजार २३६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Old Monkच्या चाहत्यांनो सावधान! ७ वर्ष जुन्या दाव्यावर कंपनीची माघार, बाटलीचा लेबल बदलणार

Manoj Jarange Patil : जरांगेंचा ‘चलो मुंबई’ नारा! मराठा बांधव मुंबईकडे कूच करण्यासाठी सज्ज

OBC Mahamorcha : ओबीसी समाजाची मोठी तयारी! १ सप्टेंबरला पाटसहून महामोर्चा

फेक नॅरेटिव्हचा आरोप, राहुल गांधींवर निशाणा अन् CJPचा नवा अर्थ; फडणवीसांच्या भाषणात काय काय?

Hockey: भारत आठव्या स्थानावर राहिल्याने हॉकी इंडियाचे अध्यक्ष नाराज; विश्वचषकातील कामगिरीवर दिलीप तिर्की म्हणाले, “मीही खूश नाही”

SCROLL FOR NEXT