नाशिक

लाचखोर सहायकाला एका वर्षाचा कारावास

CD
लाचखोर सहायकाला एका वर्षाचा कारावास वैद्यकीय बिल मंजुरीसाठी घेतली होती लाच सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ३१ : शासकीय कामात मंजूर झालेल्या वैद्यकीय बिलाची रक्कम बँक खात्यात जमा करण्यासाठी दोन हजारांची लाच स्वीकारणाऱ्या वरिष्ठ सहाय्यकाला नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषी ठरवत एक वर्षाचा कारावास आणि दंडाची शिक्षा सुनावली. सातपूर येथील राज्य कामगार विमा योजना रुग्णालयातील वरिष्ठ सहाय्यक रामचंद्र नरसू माकरे असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या लाचखोराचे नाव आहे. तक्रारदाराचे शासनाकडून मंजूर झालेले वैद्यकीय बिल त्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यासाठी रामचंद्र माकरे याने १६ सप्टेंबर २०१४ ला तीन हजारांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती दोन हजार रुपये देण्याचे ठरले. रुग्णालयातील वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती कक्षासमोरील हॉलमध्ये पंचांसमक्ष दोन हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने माकरे याला पकडले होते. या प्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या. अमित खारकर यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी झाली. सरकारी अभियोक्ता ॲड. शिरीष कडवे व ॲड. सचिन गोरवाडकर यांनी सरकार पक्षातर्फे प्रभावी युक्तिवाद केला. पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी माकरे याला एका वर्षाचा कारावास आणि एक हजारांचा दंड ठोठावला. सदर खटल्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलिस अधीक्षक प्रदीप मैराळे आणि कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रूपाली खांडवी व कोर्ट पैरवी अंमलदार हवालदार प्रदीप काळोगे यांनी कामकाज पाहिले.

CM Devendra Fadnavis : डीजेच्या वादात न पडता सांस्कृतिक गणेशोत्सव साजरा करा; फडणवीस यांचे पुणेकरांना आवाहन

Lionel Messi Retirement : "हा निर्णय मनाला वेदना देणारा"; लिओनेल मेस्सीची निवृत्ती, म्हणाला, ''आता माझ्याकडे देण्यासाठी...''

Tukaram Mundhe: ‘हे तर आमचे पाळीव आहेत!’ रेस्टॉरंटच्या किचनमध्ये डझनभर उंदीर, मॅनेजरचा भन्नाट बहाणा; तुकाराम मुंढेनी सांगितला किस्सा

Old Monkच्या चाहत्यांनो सावधान! ७ वर्ष जुन्या दाव्यावर कंपनीची माघार, बाटलीचा लेबल बदलणार

Manoj Jarange Patil : जरांगेंचा ‘चलो मुंबई’ नारा! मराठा बांधव मुंबईकडे कूच करण्यासाठी सज्ज

SCROLL FOR NEXT