नाशिक

ग. स. बँक निकाल

CD
फोटो क्रमांक : 28378 धुळे : ग. स. बँक निवडणुकीत एकतर्फी विजयानंतर जल्लोष करताना लोकमान्य पॅनलचे गटनेते निशांत रंधे. शेजारी संजय शिंदे, पदाधिकारी, नवनिर्वाचित संचालक, समर्थक, आदी. --- ग.स. बँकेवर लोकमान्य पॅनलचे वर्चस्व --- एकतर्फी २१ जागांवर दणदणीत विजय; पाच जागा बिनविरोध सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. ३१ : धुळे व नंदुरबार सरकारी कर्मचारी (ग.स.) बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत लोकमान्य पॅनलने सर्व २१ जागांवर निर्विवाद विजय मिळवून बँकेवर आपले एकछत्री वर्चस्व सिद्ध केले आहे. मतमोजणीनंतर गटनेते निशांत रंधे आणि पॅनलप्रमुख संजय शिंदे यांच्यासह पदाधिकारी व नवनिर्वाचित संचालकांनी पांझरा नदीकाठच्या अग्रवाल विश्राम भवनाशेजारील सभागृहाबाहेर विजयाचा जल्लोष केला. बँकेच्या २१ जागांसाठी ६७ अर्ज दाखल झाले होते. छाननीत तीन अर्ज अवैध ठरल्याने ६४ अर्ज वैध ठरले. अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी पाच जागा बिनविरोध झाल्या. यात अहिल्यानगर जिल्हा सर्वसाधारण प्रवर्गातून संदीप येळवंडे, नाशिक जिल्हा सर्वसाधारण प्रवर्गातून लक्ष्मण देसले, अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातून शंकर वसावे, भटक्या-विमुक्त जाती-जमाती प्रवर्गातून योगेश धात्रक आणि इतर मागासवर्गीय प्रवर्गातून शशांक रंधे यांची बिनविरोध निवड झाली. उर्वरित १६ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत धुळे, नंदुरबार, नाशिक व जळगाव या चार जिल्ह्यांतील सहा हजार ४०३ मतदारांपैकी तीन हजार ३४३ मतदारांनी (५२.२१ टक्के) मतदान केले. यात दोन हजार ७९६ पुरुष आणि ५४७ महिला मतदारांनी हक्क बजावला. रविवारी (ता. ३०) २२ केंद्रांवर मतदान शांततेत झाले. निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र विरकर यांच्या मार्गदर्शनात सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अमोल इंडाईत, योगेश पाटील, नागेश पुकळे व नितेश महाले यांनी प्रक्रिया पार पाडली. विजयी व पराभूत उमेदवार आणि मते: धुळे व नंदुरबार सर्वसाधारण प्रवर्ग : प्रशांत बोरसे (२,८०८), प्रवीण भदाणे (२,८०६), दीपक अहिरे (२,७७३), बिपीनचंद्र सोनवणे (२,७६३), विजयकुमार माळी (२,७४७), अमोल शिंदे (२,७४७), बापूराव पाटील (२,७४१), मयूर पवार (२,७३३), प्रकाश बच्छाव (२,७२३), देवेंद्र बोरसे (२,७२१), दीपक निकम (२,७१८), आनंदराव करनकाळ (२,७११), वैभव सोनवणे (२,७०९). (पराभूत : रवींद्र देवरे- ३५४, कविता शिंदे- २४७). महिला राखीव प्रवर्ग : सोनाली भामरे (३,०५२), कविता मोरे (२,९१५). (पराभूत : कविता शिंदे- २७९). जळगाव जिल्हा सर्वसाधारण प्रवर्ग : भूपेंद्र बाविस्कर (३१४६). (पराभूत : राहुल सोनवणे- १४८).

CM Devendra Fadnavis : डीजेच्या वादात न पडता सांस्कृतिक गणेशोत्सव साजरा करा; फडणवीस यांचे पुणेकरांना आवाहन

Lionel Messi Retirement : "हा निर्णय मनाला वेदना देणारा"; लिओनेल मेस्सीची निवृत्ती, म्हणाला, ''आता माझ्याकडे देण्यासाठी...''

Tukaram Mundhe: ‘हे तर आमचे पाळीव आहेत!’ रेस्टॉरंटच्या किचनमध्ये डझनभर उंदीर, मॅनेजरचा भन्नाट बहाणा; तुकाराम मुंढेनी सांगितला किस्सा

Old Monkच्या चाहत्यांनो सावधान! ७ वर्ष जुन्या दाव्यावर कंपनीची माघार, बाटलीचा लेबल बदलणार

Manoj Jarange Patil : जरांगेंचा ‘चलो मुंबई’ नारा! मराठा बांधव मुंबईकडे कूच करण्यासाठी सज्ज

SCROLL FOR NEXT