नाशिक

मीरा-भाईंदर पोलिसांची सर्जिकल स्ट्राईक

CD
जळगावातून ‘ड्रग्ज’चा सव्वाकोटीचा साठा जप्त --- मीरा-भाईंदर पथकाची कारवाई; पाच किलो ‘एमडी’सह दोघे ताब्यात सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ३१ : गेल्या दोन-तीन वर्षांपासून जळगाव पोलिस ड्रग्ज नेटवर्कचा शोध घेत असताना, मीरा-भाईंदर पोलिसांनी थेट जळगावात कारवाई केली. छाप्यात दोन संशयितांसह पाच किलो ‘एमडी’चा साठा जप्त केला. या कारवाईमुळे जळगाव पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. जळगाव शहरात राजस्थान, गुजरात आणि मध्य प्रदेशमार्गे मोठ्या प्रमाणावर ड्रग्जचा पुरवठा होत असल्याचे समोर आले आहे. व्यावसायिक प्रमाणाशिवाय एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल होत नसल्याने जळगाव पोलिसांच्या कारवाया मर्यादित राहिल्या. दरम्यान, मीरा-भाईंदर, वसई-विरार गुन्हे शाखेच्या युनिट-४ पथकाने गुरुवारी (ता. २७) जळगावात छापा टाकून पाच किलो ९०० ग्रॅम एमडी, सुमारे एक कोटी २२ लाख ७७ हजार ५०० रुपयांचा साठा जप्त केला. मीरा-भाईंदर पोलिस पथकाने थेट ड्रग्जच्या फॅक्ट्रीसह मालपोस्त करणारे आणि विक्रेते अशा नेटवर्कचा छडा लावला. काही दिवसांपूर्वी ११ किलो एमडीसह ११ संशयितांना अटक झाली. त्यांच्या चौकशीत यापैकी पाच किलो ड्रग्ज जळगावात पाठविल्याचे समोर आले. त्याचा माग घेत मुंबई पोलिस पथक गुरुवारी जळगावात धडकले. पोलिस निरीक्षक प्रमोद बडाख यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक उमेश भागवत व पथकाने रामनगर मेहरुण येथून रहिम ताहेर पिंजारी (वय २८) याला ताब्यात घेतले. चौकशीत रहिमने एमडी ड्रग्जचा साठा उस्मानिया पार्क येथे सय्यद मुशादूर अली मुमताज अली (वय २९, रा. जोशी पेठ, श्री पंतनगर) याच्या घरात ठेवल्याची कबुली दिल्याने त्यालाही अटक करून ४ किलो ९११ ग्रॅम एमडी ड्रग्जचा साठा जप्त केला. चौकट स्थानिक पोलिस अवाक मुंबई पोलिसांच्या कारवाईनंतर जळगाव पोलिस दलातील ड्रग्ज व अवैध धंद्यांच्या कारवाईत तज्ज्ञ मानले जाणारे अधिकारीही अवाक झाले असून, आता विविध स्रोतांकडून माहिती संकलित करण्यात गुंतले आहेत. विशेष म्हणजे, मुंबई पोलिसांच्या कारवाईतील दोन्ही संशयित जळगाव पोलिसांसाठी नवीन असून, त्यांच्याबाबत अद्याप पुरेशी माहिती उपलब्ध नाही. जळगावनंतर पथकाने मध्य प्रदेशातही कारवाई करून ५० किलो एमडी जप्त केल्याची माहिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Devendra Fadnavis : डीजेच्या वादात न पडता सांस्कृतिक गणेशोत्सव साजरा करा; फडणवीस यांचे पुणेकरांना आवाहन

Lionel Messi Retirement : "हा निर्णय मनाला वेदना देणारा"; लिओनेल मेस्सीची निवृत्ती, म्हणाला, ''आता माझ्याकडे देण्यासाठी...''

Tukaram Mundhe: ‘हे तर आमचे पाळीव आहेत!’ रेस्टॉरंटच्या किचनमध्ये डझनभर उंदीर, मॅनेजरचा भन्नाट बहाणा; तुकाराम मुंढेनी सांगितला किस्सा

Old Monkच्या चाहत्यांनो सावधान! ७ वर्ष जुन्या दाव्यावर कंपनीची माघार, बाटलीचा लेबल बदलणार

Manoj Jarange Patil : जरांगेंचा ‘चलो मुंबई’ नारा! मराठा बांधव मुंबईकडे कूच करण्यासाठी सज्ज

SCROLL FOR NEXT