नाशिक

प्रतीक्षेनंतर जिल्ह्यात पावसाचे आगमन

CD
टुडे एकसाठी ----------- जिल्ह्यात अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पावसाचे आगमन --- हलक्या सरींनी दिलासा; शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १ : गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना अखेर दिलासा मिळाला. जिल्ह्यातील अनेक भागांत पावसाने मंगळवारी (ता.१) सकाळी हजेरी लावली. त्यामुळे दीर्घ उघडीपमुळे खरीप पिकांवर पाण्याचा ताण जाणवू लागला असताना पावसाच्या आगमनाने शेतशिवाराला काही प्रमाणात दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. गेल्या काही आठवड्यांपासून जिल्ह्यासह राज्‍यातदेखील पावसाची उघडीप होती. श्रावण महिना असतानाही सकाळपासूनच कडक ऊन व दुपारी वाढणारा उकाडा यामुळे नागरिकही हैराण झाले होते. मुख्‍य म्‍हणजे खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन, तूर, मूग, उडीद, मका आदी पिकांसाठी पावसाची गरज निर्माण झाली होती. त्यामुळे बळीराजाच्‍या नजरा आकाशाकडे लागून होत्‍या. यातच मंगळवारी जिल्‍ह्यातील अनेक भागांत तुरळक स्‍वरूपाचा पाऊस झाला. शेतशिवाराला दिलासा साधारण वीस-पंचवीस दिवसांच्‍या उघडीपमुळे जमिनीतील ओलावा कमी झाला होता. हलक्या जमिनीतील पिकांवर पाण्याचा ताण अधिक जाणवत होता. काही भागांत पिकांची पाने कोमेजू लागल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. अशास्थितीत पावसाने हजेरी लावल्याने पिकांना काही प्रमाणात जीवदान मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. दमदार पावसाची प्रतीक्षा अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मात्र, खरीप पिकांच्या पुढील वाढीसाठी सातत्यपूर्ण व समाधानकारक पावसाची आवश्यकता आहे. मंगळवारी सकाळी झालेला तुरळक स्‍वरूपाचा पाऊस पिकांसाठी पुरेसा नसून, जोरदार पावसाची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. मंगळवारी दिवसभर ढगाळ वातावरण कायम राहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Indians च्या गोटातून ४ महत्त्वाच्या अपडेट्स! हार्दिक पांड्याचे कर्णधारपद गेल्यात जमा, पण...; रोहित शर्मा त्याचा माणूस बसवणार

Raju Shetti Rajesh Kshirsagar : राजेश क्षीरसागर टक्केवारीतला माणूस, ‘असेल दम तर टांगून दाखवाच’; राजू शेट्टींचा पलटवार, शक्तीपीठ महामार्गावरून संघर्ष तीव्र

याला म्हणतात हिशोब चुकता! अमराठी रिक्षावाल्याने शिवी दिली, वंदना गुप्तेंनी बाहुबलीसारखी थेट रिक्षाच पलटी केली

Marathi News Live Updates : पाकिस्तानच्या PMOनं पोस्टमधून मोदींचा फोटो हटवला

Redmi Smartphone: 6000mAh बॅटरी अन् 50MP कॅमेरा! Redmi चा नवा 5G स्मार्टफोन लाँच; बजेट रेंजमध्ये प्रीमियम फीचर्स...

SCROLL FOR NEXT