नाशिक

जिल्ह्यात टायफाईडचा उद्रेक; पाच महिन्यांत १,८३३ रुग्ण

CD
ही बातमी मेन फिचरजवळ वापरावी) ----- NSK26H28526 (स्केच) -- ‘टायफाइड’चाही उद्रेक; तापाने फणफणले रुग्ण ------ पाच महिन्यांत १,८३३ रुग्ण; जुलै-ऑगस्टमध्ये मोठी वाढ जळगाव, ता.२ : शहरासह जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून टायफाईडच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात तब्बल एक हजार ८३३ रुग्णांची नोंद आरोग्य विभागाकडे झाली आहे. विशेष म्हणजे जूननंतर रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. जुलै व ऑगस्टमध्ये अनुक्रमे ४६३ व ४५० रुग्ण आढळले. त्यामुळे पावसाळ्यात दूषित पाणी व अन्नामुळे टायफाईडचा धोका वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे. ‘टायफाईड’ या संसर्गजन्य आजाराचा प्रसार दूषित पाणी किंवा अन्नाच्या सेवनातून होतो. स्वच्छ पाणी, योग्य स्वच्छता व हात धुण्याच्या सवयींचा अभाव असल्यास संसर्गाचा धोका वाढतो. जागतिक आरोग्य संघटनेनुसार सुरक्षित पाणी, स्वच्छताव्यवस्था, अन्न हाताळताना योग्य स्वच्छता व लसीकरण हे टायफाईडच्या प्रतिबंधातील महत्त्वाचे उपाय आहेत. ......... ग्राफ पाच महिन्यांतील रुग्णसंख्या एप्रिल ३१० मे ३१२ जून ३०१ जुलै ४६३ ऑगस्ट ४५० एकूण १,८३३ ....... दूषित पाण्याचा धोका पावसाळ्यात अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांमध्ये सांडपाणी मिसळण्याची किंवा जलवाहिन्यांमध्ये गळती होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत दूषित पाण्यामुळे टायफाईडसह इतर जलजन्य आजारांचा धोका वाढतो. नागरिकांनी पिण्याचे पाणी शक्यतो उकळून किंवा सुरक्षित पद्धतीने शुद्ध करूनच वापरावे. अन्नपदार्थ व्यवस्थित शिजवून खावेत. उघड्यावरचे, अस्वच्छ किंवा माशा बसलेले पदार्थ टाळावेत. शौचालयाचा वापर केल्यानंतर व जेवणापूर्वी साबणाने हात धुणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ....... कोट पावसाळ्यात ताप, अशक्तपणा, डोकेदुखी किंवा पोटाच्या तक्रारी असलेल्या रुग्णांनी आजार अंगावर काढू नये. विशेषतः ताप सातत्याने राहात असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेऊन आवश्यक तपासण्या करून घ्याव्यात. टायफाईडचे निदान झाल्यास डॉक्टरांनी लिहून दिलेली प्रतिजैविक औषधे निर्धारित मात्रेत व पूर्ण कालावधीसाठी घेणे महत्त्वाचे आहे. -डॉ. प्रदीप चौधरी, जळगाव.

मुकेश अंबानींची रिलायन्स आता आईस्क्रीमही बनवणार, अवघ्या १० रुपयांत लाँच केले प्रॉडक्ट, दिग्गज कंपन्याची उडाली झोप

Gokulashtami 2026: मोरपीस ते बासरी! जन्माष्टमीआधी घरात 'या' ५ वस्तू आणणे मानले जाते अत्यंत शुभ; जाणून घ्या वास्तू नियमावली..

Nutrition Week : वजन घटवण्यासाठी फायबर इतकं महत्त्वाचं का? AIIMSच्या डॉक्टरांनी सांगितलं ‘हे’ कारण

Manwat News : मानवत नगर परिषदेच्या सफाई कर्मचाऱ्यांचा ७ व्या दिवशीही कामबंद लढा कायम; तोडगा न निघाल्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव

Mumbai Rain Update: मुंबईचं हवामान अचानक बदललं, मुसळधार पावसाची सुरुवात; कसा असेल पुढील २ दिवसाचा अंदाज?

SCROLL FOR NEXT