नाशिक

वैद्यकीय अभ्यासक्रमाच्‍या शुक्रवारपासून परीक्षा

CD
वैद्यकीय अभ्यासक्रमाच्‍या शुक्रवारपासून परीक्षा --- चौथ्या टप्प्‍यातील उन्‍हाळी परीक्षेत ४० हजार विद्यार्थी प्रविष्ट सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १ : वैद्यकीय अभ्यासक्रमांच्‍या परीक्षांना शुक्रवार (ता. ४)पासून राज्‍यभरात सुरुवात होत आहे. महाराष्ट्र आरोग्‍य विज्ञान विद्यापीठातर्फे उन्हाळी २०२६ च्‍या टप्पा-४ मधील पदवी व पदव्‍युत्तर परीक्षांचा यात समावेश असून, राज्‍यस्‍तरावर ३९ हजार ८९७ विद्यार्थी या परीक्षेला सामोरे जाणार आहेत. विद्यापीठात प्रचलित झालेल्‍या पद्धतीनुसार यंदाही परीक्षेच्‍या दिवशी ऑनलाइन प्रश्‍नपत्रिका उपलब्‍ध केली जाईल. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे वैद्यकीय अभ्यासक्रमांच्‍या परीक्षांचे टप्प्‍याटप्प्‍याने आयोजन केले जाते. उन्हाळी २०२६ टप्पा-४ मधील विविध लेखी परीक्षेचे संचलन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्यंकट गिते यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. शुक्रवारी (ता. ४) सुरू होणारी ही परीक्षा २६ सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. राज्यातील एकूण १७० परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होईल. या परीक्षेत राज्‍यभरातून एकूण ३९ हजार ८९७ विद्यार्थी प्रविष्ट होणार आहेत. या टप्प्‍यात एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीयूएमएस, बीएचएमएस आदी पदवी, तसेच वैद्यकीय, आयुर्वेद आदी पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांचा समावेश असेल. पेपरफुटीसारखे गैरप्रकार रोखण्यासाठी विद्यापीठाने यापूर्वीच्‍या परीक्षांमध्ये महत्त्वाचा बदल केला आहे. हिवाळी २०२४ ते हिवाळी २०२५ व उन्हाळी २०२६ मधील पहिल्‍या तीन टप्प्‍यांतील परीक्षांमध्ये विविध अभ्यासक्रमांच्या लेखी परीक्षांच्या प्रश्नप्रत्रिका ऑनलाइन संगणक प्रणालीद्वारे परीक्षा केंद्रावर पेपर सुरू होण्याआधी पाठविण्यात आल्या होत्‍या. तसेच, उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग करून ऑनलाइन संगणक प्रणालीद्वारे तपासण्याचे कार्यही यशस्वीरीत्या केले आहे. याच प्रणालीचा यंदाही अवलंब केला जाईल. प्रश्नप्रत्रिका परीक्षेच्‍या दिवशी पाठविण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी परीक्षाकेंद्रावर एक तास आगोदर म्हणजेच सकाळ सत्रासाठी सकाळी नऊला व दुपार सत्रासाठी दुपारी एकला परीक्षा केंद्रावर उपस्‍थित राहावे, असे विद्यापीठातर्फे कळविण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : एमसीसीआयएच्या हेल्पलाइनचा दहा हजार सल्लामसलतींचा टप्पा पूर्ण; देशातील २९ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील एमएसएमईना मदत

Alephata News : नारायणगावला पैसे आणण्यासाठी गेलेला तरुण बेपत्ता; बोरी बुद्रुक येथील कालव्याजवळ आढळली मोटारसायकल

Kolhapur Municipal Corporation : कोल्हापूर महापालिकेच्या बैठकीत शारंगधर देशमुख- आदिल फरास यांच्यात जोरदार वाद; पालिकेच्या दारात कार्यकर्ते एकवटले

Shahajibapu Patil : ‘आम्ही उष्टे खाणारे नाही; तुमचे तुम्हाला राहू द्या’; सरकारने मराठा आरक्षणाबाबत तत्काळ निर्णय घ्यावा

Mhada House: म्हाडाचा गेमचेंजर निर्णय! विक्रीविना पडलेल्या घरांचा होणार 'असा' वापर; सर्वसामान्यांसाठी मोठी संधी

SCROLL FOR NEXT