नाशिक

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

CD
NSK26H28432 जळगाव : रक्षाबंधनानिमित्त एकत्र आलेल रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी व रुग्ण. ------------- शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रक्षाबंधन सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता.१ : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात लोकसेवा मंडळातील रुग्णमित्र व स्वयंसेवकांच्या वतीने शनिवारी (ता.२९) रक्षाबंधन उत्साहात साजरे करण्यात आले. रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका, ब्रदर्स, कर्मचारी व रुग्णांना राखी बांधून त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्यात आला. प्रभारी अधिष्ठाता डॉ. प्रसाद लाड, वैद्यकीय अधीक्षक डॉ. योगिता बावस्कर यांच्यासह डॉक्टर, परिचारिका व इतर कर्मचाऱ्यांना राख्या बांधण्यात आल्या. रुग्णांनाही राखी बांधून त्यांना मानसिक आधार देण्यात आला. रक्षाबंधनाच्या माध्यमातून रुग्ण, रुग्णालयातील कर्मचारी व रुग्णमित्र यांच्यातील आपुलकीचे नाते अधिक दृढ करण्याचा प्रयत्न करण्यात आला. शासकीय रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना रुग्णमित्रांकडून निःस्वार्थपणे मदत व मार्गदर्शन केले जाते. केस पेपर काढण्याचे ठिकाण, ओपीडी क्रमांक, विविध वॉर्ड, तपासण्यांची ठिकाणे व रक्ताची आवश्यकता भासल्यास करावयाची कार्यवाही याबाबत रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना मार्गदर्शन केले जाते. त्यामुळे रुग्णांना उपचाराच्या प्रक्रियेत मोठा मानसिक आधार मिळतो. या कार्यक्रमास ॲड. स्वाती पाटील, दुर्गा कापडे, रत्नाकर चौधरी, राजगोपाल पालीवाल, मोहनलाल पालीवाल, यशवंत कापडे, पुरुषोत्तम राजपूत, मिलिंद बडगुजर, ईश्वर सूर्यवंशी, चंद्रकांत तायडे, निता सांगोळे, श्याम लाठी, गौरव बडगुजर, हरीश चौधरी, भूषण शिवदे आदी रुग्णमित्र उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Palghar News: श्वानाच्या पिल्लाला बिबट्याचे अभय, बावड्या गावातील घटना सीसीटीव्हीत कैद

अमित ठाकरेंविरोधात BJP आक्रमक, माहीममध्ये भाजप-मनसे कार्यकर्ते आमनेसामने, पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात

Mamata Banerjee Relative Death : ममता बॅनर्जींच्या नातेवाईक महिलेचा संशयास्पद मृत्यू; पतीसोबत सुरू होता घटस्फोटाचा खटला

१०२ पेक्षा जास्त ताप तरीही निवेदिता सराफ यांनी केलं 'कृष्णाईच्या लेकी'चं शूटिंग; अभिनेत्याच्या हातालाही होती सलाइन

Maharashtra Cabinet Decisions : मंत्रिमंडळ बैठकीवर तुकाराम मुंढेंचा प्रभाव चार महत्त्वाचे निर्णय; एकनाथ शिंदे यांची अनुपस्थिती

SCROLL FOR NEXT