नाशिक

कुशावर्त परिसरातील गर्दी नियोजनावर भर : सिंह

CD
कुशावर्त परिसरातील गर्दी नियोजनात सुधारणा करणार --- आयुक्त शेखर सिंह : सिंहस्थ आराखड्यात आवश्‍यक बदलावर भर सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १ : तिसऱ्या श्रावणी सोमवारी त्र्यंबकेश्‍वर येथे साडेचार लाख भाविकांनी हजेरी लावली. या वेळी कुशावर्त कुंडाच्या परिसरातील गर्दी लक्षात घेता आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात गर्दी नियोजनाच्या दृष्टीने सुधारणेला अधिक वाव आहे. संबंधित यंत्रणांशी चर्चा करून आराखड्यात योग्य ते बदल करण्यात येतील, अशी माहिती सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली. सिंहस्थ कुंभमेळ्याचे काउंटडाउन सुरू झाले आहे. बरोबर एका वर्षाने मुख्य अमृत स्नान पर्वणी आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय पातळीवर कुंभ नियोजनावर भर देण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून त्र्यंबकेश्‍वर येथील तिसऱ्या श्रावणी सोमवारी नियोजनाचा प्रशासनाने अभ्यास केला. या अभ्यासावेळी आयुक्त सिंह हे काही निष्कर्षाप्रत पोहोचले आहेत. कुशावर्त कुंडाच्या भागातील गर्दीचे विभाजन करणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने भाविकांना श्री निवृत्तिनाथ मंदिराकडून कुशावर्ताकडे सोडणे व तेथून स्नानानंतर सरळमार्गे सोडण्याबाबत विचार करता येईल. अर्थात, आगामी सिंहस्थ नियोजनाच्या बैठकांमध्ये पोलिस, महसूल व संबंधित यंत्रणांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेण्यात येईल. त्यानुसार आराखड्यात बदल केले जातील. तसेच, तिसऱ्या सोमवारच्या नियोजनात काही छोट्या-मोठ्या बाबींमध्ये निदर्शनास आल्या. सिंहस्थ तयारीच्या दृष्टीने या बाबींचा विचार केला जाईल, असेही सिंह यांनी स्पष्ट केले. होल्ड ॲन्ड रिलीज यशस्वी तिसऱ्या श्रावणी सोमवारी त्र्यंबकेश्‍वरमध्ये भाविकांसाठी होल्ड ॲन्ड रिलीज पद्धती अवलंबण्यात आली. या पद्धतीत ठिकठिकाणी बॅरिकेटिंग करून टप्प्याटप्प्याने भाविकांना कुशावर्ताकडे, तेथून पुढे मंदिर मार्गावर सोडण्यात आले. त्यामुळे एकाच वेळी होणारी गर्दी टळल्याने नियोजन अधिक सुकर झाले. सिंहस्थात हीच पद्धती अधिक मोठ्या स्वरूपात अवलंबून गर्दीचे नियोजन करण्यात येईल, असे सिंह यांनी सांगितले. वाहनतळावर सुविधा त्र्यंबकेश्‍वर येथे येणारी खासगी वाहने शहराबाहेरील वाहनतळावर थांबविण्यात आली. वाहनतळापासून पुढील प्रवास भाविकांनी एसटी बसगाड्यांद्वारे केला. त्यामुळे शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यास मदत झाल्याचे सिंह यांनी सांगितले. सिंहस्थात वाहनतळावर भाविकांसाठी फूड स्टॉल्स, पिण्याचे पाणी, मदत कक्ष, आरोग्य सुविधा, शेल्टर, लॉकर आणि शौचालयांची व्यवस्था उपलब्ध करून दिली जाईल. जेणेकरून भाविकांची गैरसोय टळणार असून, यंत्रणांवरील ताण काहीसा हलका होण्यास मदत मिळेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. नवीन नदीघाटसाठी नियोजन कुशावर्त परिसरातील जुना व जीर्ण वॉच टॉवरचा मुद्दा कुंभमेळ्याच्या नियोजनात घेण्यात आला होता. सध्याच्या वॉच टॉवरची जागा बदलण्यात आली असून, तो एका बाजूला स्थलांतरित करण्यात आला. त्यामुळे कुंडाच्या परिसरातील भाग मोकळा झाला आहे. तसेच, त्र्यंबकेश्‍वरमध्ये नव्याने नदीघाटांची उभारणी करण्यात येत आहे. सिंहस्थावेळी गर्दी नियोजनानुसार या नदीघाटांवर भाविकांना स्नानासाठी सोडण्याचे विचाराधीन असल्याचे सिंह यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Cabinet Reshuffle : केंद्रिय मंत्रीमंडळात फेरबदल? महाराष्ट्रातील 'या' नेत्यांचा पत्ता कट होणार?, संभाव्य नावे समोर

India T20I Squad: संजू सॅमसनचं कमबॅक! अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर;बुमराह खेळणार की नाही?

Kalamb News : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पिंपळगाव डोळा येथे रास्ता रोको; तहसीलदारांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे

Shirur News : पूजा गई यांचा शस्त्रक्रियेदरम्यान मृत्यु झाल्याच्या प्रकरणाची सखोल चौकशी करावी; पती राहुल देवीदास गई यांची मागणी

Marathi News Live Updates : सरकारचं शिष्टमंडळ संभाजीनगरमध्ये दाखल, मनोज जरांगेंची घेणार भेट

SCROLL FOR NEXT