ॲंकर
टुडे पान एकसाठी
-------
(लालपरीचे छायाचित्र वापरावे)
------------------
भाऊ-बहिणींनी लालपरीला केले करोडपती
------
एसटीला ११ कोटींचे उत्पन्न; रक्षाबंधनला चार दिवसांत साडेचार लाख बहिणींनी केला प्रवास
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १ : रक्षाबंधन सणानिमित्त जळगाव एसटी विभागाने प्रवाशांची गर्दी लक्षात घेता एक हजारापेक्षा जादा बसफेऱ्यांचे नियोजन केले होते. यात महिला-पुरुषांची चांगली गर्दी होती. यात चार लाख ७७ हजार बहिणींनी रक्षाबंधनाच्या चार दिवसांच्या काळात प्रवास करून जळगावच्या एसटी विभागाला ११ कोटी १८ लाख १२ हजार रुपयांचे उत्पन्न हे सवलत मुल्यासह झाले असल्याची माहिती विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी ‘सकाळ’ला दिली.
भाऊ-बहिणीचा सण असलेल्या रक्षाबंधन सण साजरा करायला भाऊ-बहिणीकडे किंवा बहीण भावाकडे जात असते. त्यामुळे बसप्रवाशांच्या संख्येत वाढ होत असते. त्यात महिलांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने महिला सन्मान योजनेअंतर्गत ५० टक्के तिकीट दरात सूट दिलेली आहे. शिवाय ६५ वर्षांवरील ज्येष्ठांना ५० टक्के तिकीट दरात सुट, तर ७५ वर्षांवरील ज्येष्ठांना मोफत प्रवास योजनेमुळे बसला प्रवाशांची गर्दी वाढलेली आहे. रक्षाबंधनाला एसटीला यंदादेखील चांगलीच गर्दी झाल्याने एसटीच्या उत्पन्नातही मागील वर्षापेक्षा अधिक वाढ झाली आहे.
जिल्ह्यात ११ लाखांवर
किलोमीटर धावली बस
जळगाव एसटी विभागाने प्रवाशांची रक्षाबंधनानिमित्त गर्दी लक्षात घेऊन एक हजारापेक्षा अधिक बसफेऱ्यांचे नियोजन केले होते. त्यानुसार ११ लाख ४ हजार किलोमीटर या बस जिल्ह्यात व लांबपल्ल्याच्या मार्गावर धावल्या.
प्रवासीसंख्या दहा लाखांवर
रक्षाबंधनानिमित्त जळगाव एसटी विभागाने २८ ते ३१ ऑगस्टदरम्यान चार दिवसांसाठी अतिरिक्त बसफेऱ्यांचे नियोजन केले होते. या चार दिवसांत सहा लाख ६० हजार ३९७ सवलतधारक प्रवाशांनी प्रवास केला आहे. यात चार लाख ७७ हजार महिलांचा समावेश आहे.
तब्बल ११ कोटींचे उत्पन्न
मागील वर्षापेक्षा यंदाच्या रक्षाबंधनाला जळगाव एसटीचे उत्पन्न चांगले झाले आहे. यंदा चार दिवसांत दोन कोटी ८६ लाख २१ हजार रुपये उत्पन्न झाले आहे. तर सवलत मुल्यासह आठ कोटी ३१ लाख ९१ हजार रुपये असे उत्पन्न झाले आहे.
कोट
जळगाव एसटी विभागातील चालक-वाहक, अन्य कर्मचारी व अधिकारी यांच्या सहकार्याने रक्षाबंधनच्या काळात प्रवाशांना चांगली सेवा देऊ शकलो. यातून जळगाव एसटीला चांगले उत्पन्न प्राप्त झाले असून, हे यश सर्वांचे असून, सर्व कर्मचारी अभिनंदनास पात्र आहेत.
- प्रज्ञेश बोरसे, विभाग नियंत्रक, एसटी विभाग, जळगाव.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.