NSK26H28441 व NSK26H28442
जळगाव : गोदावरी नर्सिंग महाविद्यालयातील मुलींच्या वसतिगृहात कायमस्वरुपी प्रतिष्ठापना केलेल्या गणेशमूर्तीच्या पुजेत सहभागी डॉ. वैभव पाटील, अध्यापक. दुसऱ्या छायाचित्रात प्रतिष्ठापना केलेली विलोभनीय गणेशमूर्ती.
-------
गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात
गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष
--
मुलींच्या वसतिगृहात गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १ : येथील गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमधील मुलींच्या वसतिगृहात कायमस्वरूपी श्री गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा, स्थापना सोहळा भक्तिमय व मंगलमय वातावरणात नुकताच उत्साहात झाला. ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने संपूर्ण वसतिगृह परिसर दुमदुमून गेला.
या मंगलमय सोहळ्यास डॉ. उल्हास पाटील यांच्यासह डॉ. वैभव पाटील, डॉ. प्रशांत सोळंके, डॉ. प्रेमचंद पंडित व प्रमोद भिरूड, अधीक्षिका हर्षा कोल्हे, प्राचार्या प्रा. डॉ. विशाखा गनवीर, उपप्राचार्या प्रा. जॅसिंथ धया, डी.के.पी.सी.ओ.एन.चे प्राचार्य शिवानंद बिरादार, मुख्य परिचारिका अधीक्षक संकेत पाटील, उपमुख्य परिचारिका अधीक्षिका मनीषा खरात आदी उपस्थित होते. पुरोहीत संदीप वैद्य यांनी कर्मचारी गणेश नांदुरकर यांच्याहस्ते सपत्नीक विधीवत मंत्रोच्चाराच्या मंगलमय वातावरणात श्री गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व स्थापना करून घेतली. वसतिगृहातील विद्यार्थिनींनी मोठ्या उत्साहाने व भक्तिभावाने या सोहळ्यात सहभाग घेतला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.