नाशिक

नऊ विद्यार्थ्यांचे घवघवीत यश मेघा पालवे यांना ‘बेस्ट टीचर’ व ‘बेस्ट सेंटर’ पुरस्कार

CD
NSK26H28445 जळगाव : नॅशनल ॲबेकस वैदिक मॅथ स्पर्धेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांसह उत्कृष्ट शिक्षिका पुरस्काराने गौरविण्यात आलेल्या मेघा पालवे. ---------- ॲबेकस मॅथ स्पर्धेत नऊ विद्यार्थ्यांचे यश ---- मेघा पालवे यांना उत्कृष्ट शिक्षिकेचा पुरस्कार सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता.१ : आराध्य प्रतिष्ठानतर्फे आयोजित सोळाव्या नॅशनल ॲबेकस वैदिक मॅथ स्पर्धेत द्रोपदीनगरातील मेघा पालवे यांच्या मार्गदर्शनाखालील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळविले. रविवारी(ता.३०) झालेल्या या स्पर्धेत नऊ विद्यार्थ्यांनी विविध स्तरांवर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावून आपल्या गुणवत्तेची छाप पाडली. या स्पर्धेत ओजस्विनी मराठे, प्रियांश बाविस्कर, आदिती बाविस्कर, शिवम सोनवणे, आरजू पिंजारी, तमन्ना पिंजारी, इशान इंगळे, श्रीराज जाधव व परीक्षित पाटील यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभास हरीभक्त पारायण पंडित डॉ. मनोज महाराज, सी. विजयदत्त निकम व योगेश पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी समर्थसिंग पाटील होते. संस्थेचे उपाध्यक्ष नीलेश मोरे व सचिव सीमा एस. पाटील यांचीही उपस्थिती होती. विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल मार्गदर्शक मेघा पालवे यांना उत्कृष्ट शिक्षिका व बेस्ट सेंटर अवार्ड देऊन गौरविण्यात आले. ॲबेकस व वैदिक गणिताच्या माध्यमातून विद्यार्थ्यांत वेगवान गणना, अचूकता, एकाग्रता, तर्कशक्ती व आत्मविश्वास विकसित करण्यासाठी पालवे सातत्याने प्रयत्नशील आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Krishnaraj Mahadik Amit Thackeray : कृष्णराज महाडिकांनी पोलिसांचा डोळा चुकवला पण; अमित ठाकरेंवर जोरदार टीका, मुंबईत भाजप -मनसेमध्ये नेमकं काय घडलं?

Marathi News Live Updates : मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली, मराठा आंदोलकांकडून शोले स्टाईल आंदोलन

Diet Tips: ट्रेकिंग करताना काजू-बदाम खाताय? हाय अल्टीट्यूडवर ड्रायफ्रूट्स खाणे धोकादायक! वाचा तज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला...

Retirement Planning: 60 नाही, 43 व्या वर्षीच रिटायरमेंट! 85 लाखांचा फंड अन् 39 हजार भाडे, कपलचा प्लॅन नेमका काय?

का मोडला 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीचा संसार? म्हणाली, 'एखाद्याला निघून जायचं असतं तेव्हा...'

SCROLL FOR NEXT