नाशिक

जिल्हा निसर्ग पर्यटन

CD
धुळे : टुडे पान ३ साठी... (पूर्ण पान करणे.) -- फोटो क्रमांक : 28436 लळिंग (ता. धुळे) : पावसाळ्यात लळिंग कुरण परिसरात कोसळणारा हा धबधबा पर्यटकांचे मुख्य आकर्षण ठरत आहे. (छायाचित्रे : गोरख गर्दे) (हा फोटो किमान ६-७ कॉलममध्ये मोठा घ्यावा.) -- फोटो क्रमांक : 28439 लळिंग (ता. धुळे) : पावसाळ्याच्या आगमनाने लळिंग कुरणातील डोंगरांनी हिरवा शालू पांघरला असून या भागातून खळाळून वाहणारे ओढे-नाले. -- फोटो क्रमांक : 28440 धुळे : सध्या पावसाळ्यात नकाणे तलाव पूर्ण क्षमतेने भरून वाहत असून येथील सांडव्यावरून वाहणाऱ्या पाण्याचा व निसर्गरम्य वातावरणाचा मनमोहक नजारा पर्यटकांना भुरळ पाडत आहे. -- जिल्ह्यात हिरवाई, धबधबे अन् ऐतिहासिक वारशाचा संगम -- जिल्ह्यातील पर्यटन स्थळे निसर्गप्रेमींसाठी ठरतायेत पर्वणी; पर्यटकांची वाढली रेलचेल धनंजय सोनवणे : सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. १ : खानदेशातील निसर्गसंपन्न आणि ऐतिहासिक वारसा लाभलेला धुळे जिल्हा सध्या पावसाळ्यात अक्षरशः बहरून गेला आहे. सातपुड्याच्या पर्वतरांगा, नागमोडी वळणाचे रस्ते, खळाळणारे जलप्रपात आणि दाट हिरवाईने जिल्ह्याचे रूप पूर्णपणे पालटले आहे. जिल्ह्यातील चारही तालुक्यांमधील निसर्ग पर्यटनाची दालने खुली झाली असून, जिल्ह्यासह राज्यभरातील पर्यटकांचा ओघ या भागात मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. ---------- धुळे जिल्हा हा वैभवशाली इतिहास, समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि नैसर्गिक वैभवासाठी राज्यात परिचित आहे. जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील मुडावद येथील तापी-पांझरा नदी संगमावरील ऐतिहासिक कपिलेश्वर मंदिर असो किंवा धुळे तालुक्यातील प्राचीन लळिंग किल्ला आणि सोनगीरचा सुवर्णगिरी किल्ला असो, इतिहासप्रेमींसाठी हा जिल्हा पर्वणी ठरतो. साक्री तालुक्यातील आमळीजवळील अलालदरी धबधबा, चिवटीबारीचे हिरवेगार वन पर्यटन क्षेत्र आणि बारीपाड्याचे जैवविविधता केंद्र निसर्गप्रेमींना आकर्षित करते. शिरपूर तालुक्यातील सातपुड्याच्या कुशीत वसलेले श्री क्षेत्र नागेश्वर आणि तापी काठावरील थाळनेरचा किल्ला जिल्ह्याच्या पर्यटन समृद्धीत भर घालतात. पावसाळ्याच्या दिवसांत हे सर्व परिसर निसर्गाच्या विविध रूपांमुळे अक्षरशः नंदनवन बनतात. - निसर्गरम्य ठिकाणांमध्ये धुळे शहराजवळ असलेला लळिंग किल्ला आणि त्याच्या पायथ्याशी पसरलेले लळिंग कुरण हा पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. पावसाळ्याच्या आगमनाने हा संपूर्ण परिसर एका सुंदर हिरव्या गालीच्याने आच्छादला जातो. येथील अथांग हिरवळ, खळाळणारे ओढे, लहान- मोठे धबधबे आणि विविध जातींचे प्राणी-पक्ष्यांचा वावर या परिसराच्या सौंदर्यात आणखी भर घालतात. पावसाळ्यातील या आल्हाददायक वातावरणात फिरणे मनाला असीम आनंद आणि ताजेतवाने ऊर्जा देऊन जाते. या निसर्गरम्य परिसराचे ऐतिहासिक महत्त्व देखील खूप मोठे आहे. याच लळिंग कुरणाच्या परिसरात ‘लांडोर बंगला’ ही एक ऐतिहासिक वास्तू आहे. या वास्तूचा इतिहास अत्यंत गौरवशाली आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९३७ मध्ये या बंगल्यात काही दिवस वास्तव्य केले होते. त्यांच्या पदस्पर्शाने व सहवासाने पावन झालेली ही जागा महाराष्ट्राच्या ऐतिहासिक वारशाचे एक महत्त्वाचे प्रतीक बनली आहे. निसर्गाचे विलोभनीय सौंदर्य आणि समृद्ध इतिहास यांचा अनोखा संगम येथे पाहायला मिळतो. पावसाळ्यात ऐतिहासिक वास्तूची सफर करत निसर्गाचा मनसोक्त आनंद घेण्यासाठी हा परिसर उत्तम पर्याय आहे. ----- ( साक्री तालुका ) -- फोटो क्रमांक : 28444 चिवटीबारी (ता. साक्री) : घाटातील कड्यांवरून कोसळणारे मनमोहक धबधब्याचे दृश्य सध्या पर्यटकांना भुरळ पाडत आहे. -- फोटो क्रमांक : 28450 आमळी (ता. साक्री) : वर्षभर पर्यटकांचा राबता राहणारे श्री कन्हैयालाल महाराज मंदिर. -- फोटो क्रमांक : 28455 आमळी (ता. साक्री) : तालुक्यातील निसर्ग पर्यटनाचे केंद्रबिंदू असणारे नयनरम्य धबधबे. -- निसर्गाचे वरदान, ऐतिहासिक वास्तू अन् लोकसंस्कृतीचा मिलाफ - साक्री तालुक्यातील धबधबे, जैवविविधता अन् रिल्सच्या माध्यमातून पोहोचतेय ओळख - भिलाजी जिरे : सकाळ वृत्तसेवा वार्सा : निसर्गाचे भरभरून वरदान लाभलेला साक्री तालुका आता धार्मिक, ऐतिहासिक पर्यटनासोबतच निसर्ग पर्यटनाच्या दृष्टीने पर्यटकांना आकर्षित करत समृद्धीच्या दिशेने वेगाने पावले टाकत आहे. तालुक्यातील पश्चिम पट्टा परिसरात मोठ्या प्रमाणात होणाऱ्या पावसामुळे अनेक निसर्ग पर्यटन केंद्र निर्माण होत असून, यातून निसर्ग पर्यटनाने भरारी घेत राज्यासह देशभरातील पर्यटकांचे लक्ष वेधून घेतले आहे. - अलालदरीचे नयनरम्य धबधबे हे साक्री तालुक्यातील निसर्ग पर्यटनाचे प्रमुख केंद्रबिंदू आहेत. आमळी येथील श्री कन्हैयालाल महाराज मंदिरापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या या ठिकाणी पावसाळ्यात कन्हैयालाल धबधबा, मत्सा धबधबा आणि जांभाळी धबधबा हे पर्यटकांचे खास आकर्षण ठरतात. समुद्रसपाटीपासून अंदाजे एक हजार ८६० फूट उंच असणाऱ्या या परिसरातून होणारा प्रतिध्वनी पर्यटकांचे मन मोहून टाकतो. यासोबतच जिल्ह्यातील प्रमुख पांझरा नदीचा उगम होणारा शेंदवड भवानी परिसर विशेष लक्षवेधी असून पांझरा, मोसम आणि पुराव या त्रिगंगा नद्यांचे उगमाचे हे पवित्र स्थान ट्रेकर्ससाठी पर्वणी ठरत आहे. बारीपाडा हे देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वतःची ओळख निर्माण केलेले गाव आहे. वन व्यवस्थापन आणि लोकसहभागातून येथे विकसित करण्यात आलेले अकराशे एकरहून अधिक परिसरातील जंगल जैवविविधतेचे मोठे केंद्र बनले असून अभ्यासकांसाठी पर्यावरण अभ्यास केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. येथील वनऔषधी व वनभाज्यांची पाककला स्पर्धा जगभरातील पर्यटकांना आकर्षित करते. - समुद्रसपाटीपासून सुमारे दोन हजार ५०० मीटर उंचीवर असणारा भामेर किल्ला अहिर राजांची राजधानी म्हणून ओळखला जातो. किल्ल्यावरील गुफा, जुने अवशेष, कोरीव खांब आणि भव्य दरवाजा पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्रबिंदू आहेत. तसेच, पिंपळनेरपासून १७ किलोमीटर अंतरावर असलेले चिवटीबारी वन पर्यटन क्षेत्र नागमोडी रस्ते, दाट हिरवाई आणि उंच कड्यावरून कोसळणाऱ्या धबधब्यांसाठी प्रसिद्ध आहे. याशिवाय पानखेडा गढी, लाटीपाडा व जामखेली धरण परिसर, कोंडाईबारी, चरणमाळचे घनदाट जंगल आणि पवन-सौर ऊर्जा प्रकल्प पर्यटकांच्या पसंतीस उतरत आहेत. पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी येणारे पर्यटक कुडाशी, वार्सा, मांजरी आणि शेंदवड परिसरातील पारंपरिक आणि चवदार ''खड्डा कोंबडी'' या मांसाहारी डिशचा आस्वाद आवर्जून घेतात. तसेच अक्कलपाडा व बुराई धरण परिसरातील मासे खाण्यासाठी खवय्ये गर्दी करत आहेत. सोशल मीडियाच्या युगात तालुक्यातील अनेक तरुणांनी आदिवासी संस्कृती, कोकणी-मावची लोकगीते, पावरी नृत्य आणि डोंगऱ्यादेवाच्या परंपरेवर आधारित रिल्स तयार करून साक्रीच्या पर्यटन आणि संस्कृतीला नवी ओळख मिळवून दिली आहे. ---- ( धुळे तालुका ) -- फोटो क्रमांक : 28451 सोनगीर : सुमारे आठशे वर्षांपूर्वीचा ऐतिहासिक सुवर्णगिरी किल्ला. -- फोटो क्रमांक : 28452 लळींग (ता. धुळे) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृतीवन येथील प्रवेशद्वार. -- पावसाळ्यात धुळे तालुक्याचे बहरले निसर्गसौंदर्य - तालुक्यातील ऐतिहासिक किल्ले, मंदिरे आणि धबधब्यांवर पर्यटकांची होतेय गर्दी एल. बी. चौधरी : सकाळ वृत्तसेवा सोनगीर : धुळे तालुक्यात विविध जिल्ह्यांना जोडणारे महामार्ग, थेट मुंबई आणि पुण्याशी जोडलेला रेल्वेमार्ग व सर्व सोयीसुविधा उपलब्ध झाल्यामुळे पर्यटनाला मोठी चालना मिळाली आहे. सध्या तालुक्यात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे नदी आणि नाले प्रवाहीत झाले असून संपूर्ण निसर्ग हिरवाईने नटलेला आहे. हे आल्हाददायक वातावरण पर्यटकांसाठी खुणावत असून, ऐतिहासिक, निसर्गरम्य आणि धार्मिक पर्यटनस्थळांवर पर्यटकांची गर्दी होत आहे. धुळे तालुक्यात लळिंग किल्ला आणि सोनगीर किल्ला ही प्रमुख ऐतिहासिक ठिकाणे आहेत. धुळे शहरापासून दक्षिणेस सुमारे आठ किलोमीटर अंतरावर ५९३ मीटर उंचीच्या टेकडीवर लळिंग किल्ला उभा आहे. फारुकी राजवटीत या किल्ल्याला मोठे ऐतिहासिक महत्त्व होते. चढण्यासाठी पायऱ्या असलेला हा किल्ला पाहण्यासाठी पर्यटकांचा ओघ सतत सुरू असतो. तसेच, सोनगीर येथे सुमारे आठशे वर्षांपूर्वीचा ऐतिहासिक सुवर्णगिरी किल्ला आहे. हा गिरीदुर्ग फारूकी, मुघल आणि मराठ्यांच्या ताब्यात होता आणि येथे अखेरचा राजा उग्रसेन असल्याचा शिलालेख उपलब्ध आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे ३०४ मीटर उंच असलेला हा किल्ला सोप्या चढणीचा असून, पर्यटक नेहमी येथे भेट देतात. - धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीने धुळे तालुका समृद्ध आहे. धुळे शहरातील पांझरा नदीकाठचे एकविरा देवी मंदिर, पांझरा नदीतील उंच व आकर्षक शिवमूर्ती, शहरात सुंदर कोरीव काम असलेले स्वामीनारायण मंदिर ही प्रमुख स्थळे आहेत. सोनगीर येथे आनंदवन संस्थानचे संस्थापक गुरुगोविंद महाराज यांचे समाधी मंदिर असून, तिथे दरवर्षी विविध उत्सव साजरे होतात. सोनगीर- दोंडाईचा रस्त्यावरील सोमेश्वर महादेव मंदिर हे चौदाव्या शतकातील असून परकीय आक्रमकांनी ते तोडले होते. मराठ्यांच्या काळात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी १७७० मध्ये या मंदिराची पुनर्बांधणी केली आणि येथे वर्षभरात कधीही मुहूर्त न बघता विवाह लावले जातात. शिरूड येथील कालिकादेवी मंदिर अतिप्राचीन असून, तिथे तांदळा स्वरूपातील स्वयंभू मूर्ती आणि काळ्या पाषाणातील कोरीव मूर्ती आहे. ५३ कुळांची कुलदेवता असल्याने तिथे भाविकांची मोठी गर्दी असते. याशिवाय धुळे शहराजवळ असलेला नकाणे तलाव तसेच अक्कलपाडा, पुरमेपाडा, गोंदूर व देवभाने ही धरणे पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. ---- ( शिरपूर तालुका ) -- फोटो क्रमांक : 28453 अजनाड (ता. शिरपूर) : श्री नागेश्वर  महादेवाचे तीर्थक्षेत्र श्री क्षेत्र नागेश्वर. -- श्री क्षेत्र नागेश्वर : श्रावणातील आध्यात्मिक पर्वणी - शिरपूर तालुक्यात सातपुड्याच्या कुशीत वसलेले पर्यटन व अध्यात्माचे अनोखे केंद्र सचिन पाटील : सकाळ वृत्तसेवा शिरपूर : ऐहिक आणि पारमार्थिक जीवनातील सर्व दुःखे दूर करण्याचे सामर्थ्य असलेले श्री नागेश्वर  महादेवाचे परमपवित्र तीर्थक्षेत्र श्री क्षेत्र नागेश्वर शिरपूर तालुक्यातील अजनाड बंगला गावाजवळ सातपुड्याच्या डोंगररांगात दिमाखात उभे आहे. निसर्गसौंदर्याने बहरलेल्या घनदाट वृक्षराजीत विसावलेले हे स्थान भाविकांसह पर्यटकांना नेहमीच भुरळ घालणारे ठरले आहे. - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी त्यांच्या काळातील ज्या महादेव मंदिरांचा जीर्णोद्धार केला त्यात नागेश्वराचाही समावेश होता. अत्यंत दुर्गम भाग असल्यामुळे एकेकाळी येथे भाविकांची संख्या नगण्य होती. परंतु प्रियदर्शनी सहकारी सूतगिरणीचे अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांनी या क्षेत्राची महती ओळखत १९९५ मध्ये ‘नागेश्वर सेवा संस्थान’ची स्थापना केली. त्यांच्या नेतृत्वाखाली मंदिराचा आकर्षक जीर्णोद्धार करण्यात आला. मूळ मंदिराची रचना कायम राखत त्यांनी राज्यभरातील तीर्थक्षेत्रांमध्ये नागेश्वरला अव्वल स्थान मिळवून दिले. परिणामी महाराष्ट्र, मध्यप्रदेश, कर्नाटक व गुजरात राज्यातील भाविक येथे नियमित हजेरी लावत आहेत. श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी येथे मोठी यात्रा भरते आणि संपूर्ण महिनाभर भाविकांची अलोट गर्दी असते. - २०२० मध्ये भूपेशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य कलशारोहण सोहळा पार पडला. गणपती, देवी पार्वती, शंभू महादेव, गुरुदत्त, ऋषी महाराज, मोती देवी आणि हनुमंत यांच्या भव्य मूर्तींची प्रतिष्ठापना केल्यामुळे या परिसराला ‘मंदिरांचे आगार’ अशी नवी ओळख मिळाली आहे. येथे संत- महंतांचे कीर्तन आणि सत्संग समारंभ नियमितपणे आयोजित केले जातात. या परिसराच्या पायथ्याशी औदुंबराच्या मुळाजवळ गोमुख असून त्यातून बारमाही जलप्रवाह वाहतो. उन्हाळ्यात गार तर पावसाळा व हिवाळ्यात कोमट पाणी निघणारा हा प्रवाह दुष्काळातही कधीच आटत नाही. नाथपंथीयांचे गुरू गोरक्षनाथ यांची ही तपोभूमी असून डोंगरात त्यांची गुहा आहे. येथे कालसर्प पूजा व नारायण नागबली पूजा अल्प खर्चात सुलभतेने होत असल्याने भाविकांची मोठी गर्दी होते. तसेच, तपनभाई पटेल यांनी विमानातून सीडबॉल टाकून केलेल्या अभिनव प्रयोगामुळे आज डोंगरमाथ्यावर घनदाट वृक्षराजी बहरली आहे. प्रदूषणमुक्त वातावरणामुळे हे ठिकाण आता ‘आदर्श विवाह केंद्र’ म्हणूनही नावारूपाला आले आहे. मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गापासून १३ किमी अंतरावर असलेल्या या क्षेत्रास भेट देण्यासाठी चोपडा फाटा ते अजनाड आणि पुढे खाजगी वाहनांचा सहज प्रवास करता येतो. - थाळनेरचा ऐतिहासिक किल्ला शिरपूर तालुक्यातील तापी नदीच्या काठावर असलेला थाळनेरचा त्रिकोणी किल्ला ऐतिहासिक वारसा सांगतो. १३७० मध्ये मलिकवर खान याने फारुकी घराण्याची सत्ता स्थापन करून बांधलेल्या या किल्ल्यावर मोगल, मराठे, होळकर आणि अखेरीस १८१३ मध्ये इंग्रजांचे राज्य आले. येथे फारुकी घराण्यातील मलिक राजा (१३९६), मलिक नसीर (१४३७), मिरान अदील शाह (१४४१) आणि मिरान मुबारक खान (१४५७) यांच्या अरेबिक शिलालेखयुक्त ऐतिहासिक कबरी आहेत. या परिसराजवळच अनेर अभयारण्य असून अनेक वन्यजीवांचा वावर या ठिकाणी आहे. --

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गणेशोत्सवाच्या मिरवणुकांमध्ये लेझर लाईटवर बंदी; पुणे प्रशासनाचा मोठा निर्णय

Astrology: पुढच्या 48 तासांत बदलतीये ग्रह दशा! चमकणार 'या' राशींचे नशीब; धनलाभासह मिळतील मोठ्या आनंदाच्या बातम्या

Gas Cylinder : घरगुती वापराचा सिलिंडर, खाऊगल्लीत ‘सरेंडर’; शहरातील वाढत्या प्रकारांकडे भरारी पथकांचा काणाडोळा

Marathi News Live Updates : मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली, मराठा आंदोलकांकडून शोले स्टाईल आंदोलन

Manoj Jarange Patil : उपाशीपोटी कोणी राहू नये म्हणून... आंतरवालीत 3 क्विंटल दाळबाटी!

SCROLL FOR NEXT