नाशिक

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर थरार

CD
ॲंकर (बातमी आजच घ्यावी) -------- NSK26H28458 जळगाव : युवतींच्या दहीहंडीचा थरार शनिवारी पाहायला मिळणार आहे. या उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी अशोक जैन यांची भेट घेतली, त्याप्रसंगी ज्योती जैन यांच्यासह समितीच्या पदाधिकारी. ----- युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर थरार! ----- शनिवारच्या सोहळ्यात १५ संघांमधून सहाशेवर महिलांचा सहभाग सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता.१ : नारीशक्तीचा जागर, साहसाचा थरार व महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा जल्लोष, अशा अनोख्या संगमातून ‘युवतींची दहीहंडी’ येत्या शनिवारी (ता.५) सायंकाळी सहापासून शहरातील शिवतीर्थ मैदानावर रंगणार आहे. त्या पार्श्वभूमीवर युवतींच्या दहिहंडी उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, ज्योती जैन, सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन यांची भेट घेतली. समितीच्या नियोजनाविषयी या बैठकीत चर्चा झाली. याप्रसंगी समितीच्या अध्यक्षपदी डॉ. सीमा पाटील, उपाध्यक्षा उषा जैन, कार्याध्यक्षा डॉ. सोनाली महाजन, स्वागत समिती प्रमुख डॉ. कल्याणी नागूलकर व सचिव प्रा. शमा सराफ, खजिनदार नीलम जोशी, स्वागत समितीच्या सदस्या रुपाली वाघ, डॉ. अनिता पाटील, हर्षाली चौधरी, सोनाली पाटील, लेफ्टनंट डॉ. हेमाक्षी वानखेडे, मिनल जैन, युवाशक्ती फाऊंडेशनचे विराज कावडिया उपस्थित होते. १४-२ तब्बल ६८५ महिलांचा सहभाग या सोहळ्यात शाळा-महाविद्यालयांच्या १५ संघांमधून तब्बल ६८५ महिला गोविंदा युवतींच्या धाडसी मानवी मनोऱ्यांचा थरार जळगावकरांना अनुभवता येतील. विशेष म्हणजे सहभागी होणाऱ्या प्रत्येक महिला गोविंदाचा दहा लाख रुपयांचा अपघाती विमा आयोजकांकडून उतरविण्यात आला आहे. रोख ६३ हजारांची पारितोषिके मागील वर्षीच्या दहिहंडीच्या समारोपावेळी अशोक जैन यांनी रोख पारितोषिके देण्याचे जाहीर केले होते. त्याची पूर्तता म्हणून यंदाच्या दहिहंडी फोडणाऱ्या युवतींना रोख पारितोषिके दिली जाणार आहेत. युवतींच्या प्रथम विजेत्या संघाला ३१ हजार १११ रुपये, द्वितीय संघाला २१ हजार १११, तृतीय संघाला ११ हजार १११ अशी पारितोषिके असतील. ढोलपथक ठरणार आकर्षण दहिहंडीच्या थरारासोबतच कार्यक्रमात विविध आकर्षणांची रेलचेल असेल. ‘शौर्यवीर’ आणि ‘महाबली’ या दोन ढोल पथकांमधील तब्बल २१३ ढोलवादक आपल्या दमदार वादनाने वातावरणनिर्मिती करतील. यासोबतच मर्दानी खेळ, सांस्कृतिक नृत्य, रिदमिक योगा, लाईव्ह सिंगिंग, स्लाईन डीजे, लेझर शो व आकर्षक फटाक्यांची आतषबाजी हे कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरणार आहे. ------ कोट महाराष्ट्रातील एकमेव युवतींची दहीहंडी अशी ओळख निर्माण केलेल्या युवतींच्या सामर्थ्याला मंच देण्याचा उद्देश आहे. पारंपरिक सण-उत्सवांत युवतींचा सक्रिय सहभाग वाढविण्यासोबतच त्यांच्यातील आत्मविश्वास, संघभावना, नेतृत्वगुण, साहस व निर्णयक्षमता यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न या माध्यमातून होत आहे. - अशोक जैन, अध्यक्ष जैन इरिगेशन, जळगाव.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolkata Stamped: कोलकात्यात दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरी; १७ भाविकांचा मृत्यू

IND vs WI 5th T20I: भारत-वेस्ट इंडिज पाचव्या सामन्याचा निकाल लागला... ९-९ षटकांचा सामना नेमका कुणी जिंकला?

Resort Fire Tragedy : पर्यटकांच्या रिसॉर्टला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांसह १० पर्यटकांचा होरपळून मृत्यू, ९ गंभीर!

Couple Found Dead: पत्नीच्या वाढदिवशीच 'त्या' दोघांनी संपविले जीवन; 'आम्ही जग सोडतोय...!' कोणाला पाठवला ईमेल?

IND vs WI 5th T20I: इशान किशनचे वादळ, मोडला विक्रम; भारताने ९ षटकांच्या मॅचमध्ये किती धावा केल्या? पावसाने पुन्हा घोळ घातला

SCROLL FOR NEXT