नाशिक

अपघातात एक ठार

CD
पान तीन -------------------- 17534 सुजित गायकवाड ----------- सातपूर औद्योगिक वसाहतीत अपघातात दुचाकीस्वार ठार सकाळ वृत्तसेवा सातपूर, ता. १ : औद्योगिक वसाहतीतील निलय कंपनी येथील हनुमान मंदिरासमोर अपघात होवून जेल रोड येथील सुजीत राजेंद्र गायकवाड (वय या ४३ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. सकाळी अकराला हा अपघात झाला. सुजित गायकवाड हे सकाळी दुचाकीवरून निलय कंपनी परिसरातून जात होते. त्याच्यापुढे एक चारचाकी वाहन जात होते. या वाहनाने अचानक ब्रेक लावला. त्यामुळे गायकवाड दुचाकीसह खाली पडले. त्याचवेळी समोरून येणाऱ्या ‘छोटा हत्ती’ वाहनाच्या पुढील चाकाखाली आल्याने ते गंभीर जखमी झाले. अपघातानंतर त्यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सुजित गायकवाड (रा. राहुलनगर, पवारवाडी, जेलरोड) हे परिसरातील सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभागी होत. विविध सामाजिक कार्यक्रमांत ते पुढाकार घेत असल्याने मित्रपरिवार व नागरिकांमध्ये त्यांचा परिचय होता. त्यांच्या आकस्मिक निधनाची माहिती मिळताच परिसरात शोककळा पसरली. त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ आणि बारा वर्षांची मुलगी असा परिवार आहे. ------------------ चौकट करणे ---------- रस्ता सुस्थितीत, महापालिकेचा दावा दरम्यान सुजित यांचा मृत्यु खड्ड्यांमुळे झाल्याची चर्चा आहे. मात्र महापालिकेकडून रस्ता सुस्थितीत असल्याचा खुलासा करण्यात आला. सातपूर एमआयडीसी परिसरातील निलय इंडस्ट्रीसमोर रस्त्याची उपलब्ध रुंदी अंदाजे ५ ते ५.५० मीटर असून, अपघाताच्या ठिकाणी रस्ता सुस्थितीत असल्याचे प्रथमदर्शनी आढळून आल्याचे सांगण्यात आले. अपघाताची घटना अत्यंत दुर्दैवी असून, उपलब्ध प्राथमिक माहितीनुसार, अपघाताच्या ठिकाणी रस्ता सुस्थित होता आणि रस्त्याच्या खराब स्थितीमुळे हा अपघात झाल्याचे प्रथमदर्शनी आढळून येत नसल्याचे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Delhi Visit : एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौरावर; धनुष्यबाण चिन्ह गोठणार?, मुलगा श्रीकांत शिंदेंना मंत्रीमंडळात संधी मिळणार?

Ranji Trophy: शार्दुल ठाकूरला कर्णधारपदावरून काढलं, मग नवा कॅप्टन कोण? मुंबई क्रिकेटचा मोठा निर्णय

MPSC Exam : ‘एमपीएससी’ परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणा; स्पर्धा परीक्षा शिक्षक, विद्यार्थ्यांची मागणी

Marathi News Live Updates : सावरगाव परिसरात वन्यजीवांच्या शिकारीचा प्रयत्न, दोन आरोपी फरार; बंदुकीसह दुचाकी जप्त

Wagholi Crime : दागिने चोरी करणारी आंतरराज्यीय महिला टोळी जेरबंद; मध्यप्रदेश मधील सहा महिलांचा समावेश

SCROLL FOR NEXT