पान चार मेन (शहर व जिल्हा कॉमन)
----------------
''सकाळ कबड्डी प्रीमियर लीग''ची आजपासून थरार
क्रीडाप्रेमींना अनुभवता येणार स्पर्धेतील रंगत, शनिवारी अंतिम लढत
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता.१ः ''सकाळ''तर्फे आयोजित ''सकाळ कबड्डी प्रीमियर लीग'' स्पर्धेचा उद्घाटन सोहळा बुधवारी (ता.२) दुपारी दोनला पंचवटीतील स्व.मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुल येथील इनडोअर कबड्डी कोर्टवर होणार आहे. शनिवारी (ता.५) स्पर्धेची अंतिम लढत होणार असून, या वेळी अंतिम विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक प्रदान केले जाणार आहेत.
स्पर्धेच्या उद्घाटन समारंभास महापौर हिमगौरी आहेर-आडके, मविप्रचे सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे, फ्रवशी ग्रुप ऑफ स्कूलचे प्रमुख रतन लथ, सिंग वॉरीयर्स संघाचे गोल्डी आनंद, दीपक बिल्डर्सचे दीपक चंदे, एसएमबीटी रूग्णालयाचे डॉ.हर्षल तांबे, नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विनोद शाह, बागड प्रॉपर्टीज्चे दीपक बागड, महात्मा गांधी विद्यामंदिर संस्था व आदिवासी सेवा समितीच्या समन्वयिका संपदा हिरे, नरेडकोचे सरचिटणीस भाविक ठक्कर आदी उपस्थित राहाणार आहेत.
स्पर्धेनिमित्त चार दिवस चुरशीच्या लढती बघायला मिळणार आहेत. प्रकाशझोतात सामने खेळविण्यात येणार असून, क्रीडाप्रेमींसाठी ही पर्वणी ठरणार आहे. या स्पर्धेतील सामने प्रारंभी साखळी पद्धतीने खेळविले जाणार असून, प्रत्येक संघाला एकमेकांसोबत लढतीची संधी मिळणार आहे. या कामगिरीच्या आधारे नंतर बाद पद्धतीचे सामने खेळविले जाणार आहेत. अव्वल चार संघांमध्ये उपांत्य फेरी व पुढे अंतिम फेरीचा सामना खेळविला जाईल. या स्पर्धेसाठी फ्रवशी ग्रुप ऑफ स्कूल्स, सिंग वॉरीयर्स, जेम्स इंग्लिश मिडीयम स्कूल, निशम डेव्हलपर्स, बागड प्रॉपर्टीज्, एसएमबीटी हॉस्पिटल, मराठा विद्या प्रसारक समाज संस्था आणि हिरे ॲकॅडमी यांचे मोलाचे सहकार्य लाभते आहे.
------------
28460
कबड्डी हा महाराष्ट्राच्या रक्तात भिनलेला खेळ आहे. शारीरिक ताकदीसह चपळता, चतुराई आणि सांघिक एकजुटीचा खरा कस लागतो. ‘सकाळ’ने कबड्डी प्रीमियर लीगच्या माध्यमातून भव्य मंच उभा केला आहे. इतरही खेळाचे ''सकाळ''ने भव्य प्रमाणात आणि दरवर्षी आयोजन करावे, अशी अपेक्षा आहे. नाशिकमध्ये प्रतिभेची कमी नसून, स्पर्धेतील खेळाडूंची गुणवत्ता बघायला मिळेल.
- रतन लथ,
अध्यक्ष, फ्रवशी ग्रुप ऑफ स्कूल्स.
-------------
कबड्डीतून जिद्द, ताकद, शिस्त आणि संघभावना शिकायला मिळते. ‘सकाळ’च्या माध्यमातून कबड्डीला एवढ्या मोठ्या आणि व्यावसायिक स्वरूपात व्यासपीठ मिळत असल्याची बाब कौतुकास्पद आहे. स्पर्धेतून युवा खेळाडूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळेल. आगामी काळात इतरही खेळांच्या स्पर्धा भरविल्या जातील, अशी अपेक्षा आहे. याद्वारे खेळांमधून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू घडतील.
- गोल्डी आनंद
सिंघ वॉरियर्स, नाशिक.
-------------------
ग्रंथालयातून घेणे
जिल्ह्यातील कबड्डीपटूंना व्यासपीठ मिळावे, ग्रामीण भागातील गुणवंत खेळाडूंना कौशल्याची संधी मिळावी, या उद्देशाने ‘सकाळ कबड्डी प्रीमियर लीग’सारख्या स्पर्धांचे आयोजन महत्त्वाचे आहे. कबड्डी स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडूंमध्ये सांघिक भावना, शिस्त आणि आत्मविश्वास निर्माण होईल. मविप्रने दिलेल्या दोन्ही संघांतील खेळाडूंना आवश्यक पाठबळ देताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. नाशिकच्या क्रीडा क्षेत्राला बळ देण्यासाठी अशा उपक्रमांना सर्वतोपरी सहकार्य केले जाईल.
- ॲड. नितीन ठाकरे, सरचिटणीस, मराठा विद्या प्रसारक समाज
---------------------
28463
मातीशी नाते सांगणाऱ्या कबड्डीसारख्या देशी खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘सकाळ’ वृत्तसमुहाने नाशिकमध्ये आयोजित केलेली ‘सकाळ कबड्डी प्रीमियर लीग’ निश्चितच कौतुकास्पद आहे. युवा खेळाडूंना व्यासपीठ देणाऱ्या या उपक्रमास बागड प्रॉपर्टीज व बागड परिवारातर्फे मनःपूर्वक शुभेच्छा. या स्पर्धेला बळ देताना आम्हाला विशेष आनंद व अभिमान आहे.
- दीपक बागड,
बागड प्रॉपर्टीज व बागड परिवार.
-------------
28466
''सकाळ''तर्फे नाशिक सकाळ कबड्डी प्रीमियर लीगचे आयोजन केले आहे. नाशिकच्या मातीतून घडणाऱ्या गुणवान खेळाडूंना व्यासपीठ मिळावे, त्यांच्या खेळाला प्रोत्साहन मिळावे आणि क्रीडा संस्कृतीला नवी दिशा मिळावी, हा या स्पर्धेमागचा मुख्य उद्देश आहे. स्पर्धेस नाशिककरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करतो.
- मनिष बोरस्ते,
अश्वमेध रायडर, अश्वमेध करिअर ॲकॅडमी नाशिक.
----------
नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाचे कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या खेळाडूंचा त्रिमूर्ती बॉईज हा संघ मैदानात उतरणार आहे. ''सकाळ''तर्फे आयोजित केलेल्या या स्पर्धेनिमित्त खेळाडूंना क्रीडा कौशल्ये दाखविण्याची चांगली संधी मिळते आहे. स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन, शिस्तीमुळे खेळाडूंना व्यावसायिक अनुभव मिळेल. भविष्यातही अशाच प्रकारच्या नाविन्यपूर्ण आणि प्रोत्साहनपर उपक्रमांमध्ये सहभागी होऊ.
- प्रभारी प्राचार्या अनुजा आशा-अनिल वंजारी (वणवे).
----------
28469
कौशल्ये, ताकद आणि चतुराई या कौशल्यांचा वापर करीत स्वतःचे रक्षण करून चुरशीच्या क्षणी निर्णयक्षमतेची कसोटीवर मात करण्यासाठी आमचा ‘सपकाळ वॉरिअर्स हा संघ पुरेपूर ताकदीने उतरला आहे. सराव सामने खेळताना सर्व खेळाडूंच्या समुपदेशनाने त्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. त्या जोरावर प्रतिस्पर्ध्यावर मात करण्यासाठी सकाळ प्रीमियर लीगसाठी संघ सज्ज झाला आहे.
- डॉ. रवींद्र सपकाळ, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक,
सपकाळ नॉलेज हब.
---------------
28470
''सकाळ कबड्डी प्रीमियर लीग'' या अभिनव, प्रेरणादायी आणि क्रीडा क्षेत्राला नवी दिशा देणाऱ्या उपक्रमाबद्दल सकाळ परिवाराचे अभिनंदन. कबड्डीसारख्या महाराष्ट्राच्या मातीत रुजलेल्या आणि गौरवशाली परंपरा लाभलेल्या खेळाला व्यासपीठ उपलब्ध करून देणे, तसेच युवा खेळाडूंना आपल्या गुणवत्तेचे प्रदर्शन करण्याची संधी यानिमित्त मिळेल. आगामी काळात महिला व पुरुष खेळाडूंना समान संधी देणारे आणखी व्यापक उपक्रम राबविले जातील, असा विश्वास आहे.
- डॉ. संपदा हिरे, समन्वयिका,
महात्मा गांधी विद्यामंदिर व आदिवासी सेवा समिती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.