नाशिक

सिंहस्थामुळे दुरावलेल्या धार्मिक परपरांचा समन्वय

CD
सिंहस्थाचा खरा केंद्रबिंदू ‘गोदावरी’च! --- त्र्यंबकेश्वर ते नाशिक-पंचवटी अखंड तीर्थसाखळी; पौराणिक अभ्यासकांचे मत किंवा सिंहस्थामुळे दुरावलेल्या धार्मिक परपरांचा समन्वय नाशिक- त्र्यंबकेश्‍वर एकाच तीर्थस्थानाचे दोन बिंदू प्रशांत भरवीरकर : सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १ : गुरूचा सिंह राशीत प्रवेश आणि त्यानंतर ‘गोदावरी’त होणारे पवित्र स्नान एवढीच सिंहस्थ कुंभमेळ्याची मर्यादित व्याख्या घेतली जाते. मात्र, भौगोलिक गणनेत नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थाची मुळे शोधली तर या पर्वाचा महत्त्वाचा धार्मिक परिघ समोर येतो. ‘गोदावरी नदी’च सिंहस्थाचा खरा केंद्रबिंदू असून, तिचा उगम आणि गौतमी म्हणून झालेले अवतरण त्र्यंबकेश्वरी आहे. त्यामुळे ही दोन टोके किंवा दोन परंपरा न मानता एकाच तीर्थस्थानाचे दोन बिंदू मानावेत, असे मत पौराणिक अभ्यासक व्यक्त करीत आहेत. एक नदी, दोन प्रमुख तीर्थकेंद्रे आणि हजारो वर्षांची पौराणिक स्मृती यातूनच नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थाची खरी धार्मिक ओळख तयार झाली आहे. नाशिकच्या पौराणिक ओळखीत जनस्थान, पंचवटी, रामतीर्थ, गोदावरी आणि रामायण परंपरा यांना विशेष स्थान आहे. त्यामुळे सिंहस्थाची धार्मिक व्याप्ती केवळ कुशावर्त किंवा रामतीर्थापुरती मर्यादित नसून, ब्रह्मगिरी- त्र्यंबकेश्वर-गोदावरी- नाशिक- पंचवटी अशी एक अखंड तीर्थसाखळी असल्याचे पौराणिक संदर्भातून दिसते. यातील सर्वांत महत्त्वाचा धागा म्हणजे गुरूचा सिंह राशीत प्रवेश. परंपरेनुसार याच काळात ‘गोदावरी’चे धार्मिक महात्म्य विशेष वृद्धिंगत होते. या काळात देवता, तीर्थे आणि पवित्र नद्या गौतमीच्या तीरावर वायुरूपाने येतात, अशी आख्यायिका काही पुराणाधारित परंपरांमध्ये आहे. म्हणजेच गुरू हा सिंहस्थाचे ‘कालमान’ ठरवितो; पण त्र्यंबकेश्वरचे तीर्थमाहात्म्य त्याला ‘धार्मिक अर्थ’ देते, असा निष्कर्ष पौराणिक अभ्यासक काढत असल्याने एक नवी परंपरा यानिमित्त सुरू होण्याची नांदी ठरत आहे. समान दृष्टिकोनातून ‘स्नान’ व ‘दर्शन’ पुराणातील आख्यायिकेनुसार ब्रह्मगिरी पर्वतावर गौतम ऋषींनी तपश्चर्या केली. गौतमांच्या प्रार्थनेने गोदावरी पृथ्वीवर अवतरली आणि ‘गौतमी’सह पुढे गोदावरी म्हणून ओळखली गेली, अशी कथा आहे. कुशावर्त हे तिचे प्रकटस्थान मानले जाते. याच धार्मिक परंपरेत भगवान शिव त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगरूपाने येथे प्रकट झाले, अशी आख्यायिका आहे. यामुळे सिंहस्थातील ‘स्नान’ आणि ‘दर्शन’ हे दोन वेगळे धार्मिक विधी नसून, एकाच तीर्थपरंपरेचे दोन टप्पे मानता येतात. सिंहस्थाची वेळ गुरू ठरवितो; मात्र गोदावरी आणि तिचे त्र्यंबकेश्वर येथील प्रकटस्थान सिंहस्थाचे तीर्थस्वरूप ठरविते. त्यामुळे त्र्यंबकेश्वर हा सिंहस्थाचा केवळ भौगोलिक भाग नसून, त्याच्या धार्मिक संकल्पनेचा उगमबिंदू आहे. - श्री श्री भाऊनाथ महाराज, धर्माचार्य प्रमुख, विश्‍व हिंदू महासंघ नाशिकच्या सिंहस्थाचा धार्मिक भूगोल ब्रह्मगिरी - गौतम ऋषींची तपोभूमी कुशावर्त - गौतमी-गोदावरीचे प्रकटस्थान त्र्यंबकेश्वर- ज्योतिर्लिंग क्षेत्र गोदावरी - सिंहस्थाच्या स्नानपरंपरेचा केंद्रबिंदू नाशिक/जनस्थान - रामायणाशी जोडलेले तीर्थक्षेत्र पंचवटी/रामकुंड - प्रमुख धार्मिक-स्नान क्षेत्र गोदावरीचे उगमस्थान त्र्यंबकेश्वर-ब्रह्मगिरी आहे. तिचा विस्तीर्ण तीर्थप्रदेश नाशिक असून रामतीर्थासारखी प्रमुख स्नानतीर्थे कालांतराने विकसित झाली. त्यामुळे त्र्यंबक आणि नाशिक यांना वेगवेगळी धार्मिक तीर्थे म्हणून पाहण्याऐवजी एका विस्तीर्ण तीर्थक्षेत्राचे दोन केंद्रबिंदू म्हणून पाहणे अधिक अर्थपूर्ण ठरेल. - गणेश बुवा, पौराणिक अभ्यासक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loose Oil Sale Maharashtra : मोठा निर्णय! देवेंद्र फडणवीसांकडून तुकाराम मुंढेंच्या आदेशाला केराची टोपली? सुटे खाद्यतेल विक्रीला परवानगी

कर्जाचा तगादा, पतीसह पत्नीने उचललं टोकाचं पाऊल; पलूस तालुका हादरवणारी घटना

FDA Action : ‘ब्लिंक कॉमर्स’चा परवाना निलंबित! अस्वच्छतेच्या त्रुटी कायम; अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

Marathi News Live Updates : सावरगाव परिसरात वन्यजीवांच्या शिकारीचा प्रयत्न, दोन आरोपी फरार; बंदुकीसह दुचाकी जप्त

Pune News : चारच्या पुढे बेस-टॉप असल्यास गुन्हा दाखल होणार; साऊंड सिस्टिम जप्त करण्याचा पोलिसांचा इशारा

SCROLL FOR NEXT