नाशिक

ग्रामपंचायत अधिकारी मोर्चा

CD
धुळे : टुडे १ साठी... -- फोटो क्रमांक : 28459 धुळे : जिल्हा परिषदेत विविध मागण्यांसाठी संघटीत ग्रामपंचायत अधिकारी युनियनचे पदाधिकारी. -- ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची सुरक्षा ऐरणीवर -- मूक मोर्चा : शिवरे प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. १ : शिवरे (जि. जळगाव) येथे ग्रामसभेदरम्यान झालेल्या हुल्लडबाजीमुळे ग्रामपंचायत अधिकारी पी. एन. पाटील यांचा मृत्यू झाला. या घटनेच्या निषेधार्थ आणि ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या सुरक्षेच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियनच्या येथील जिल्हा शाखेतर्फे सोमवारी (ता. १) कामगार कल्याण भवनापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मूक मोर्चा काढण्यात आला. - मोर्चात राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियनचे पदाधिकारी व जिल्ह्यातील अधिकारी सहभागी झाले होते. शिवरे येथील ग्रामसभेत झालेल्या गोंधळामुळे ग्रामपंचायत अधिकारी पी. एन. पाटील यांना मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागला. ज्यामुळे त्यांना हृदयविकाराचा झटका आला. या घटनेमुळे राज्यातील ग्रामपंचायत अधिकाऱ्यांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण पसरले आहे. ‘सध्या ग्रामसभा नव्हे, राजकीय कुस्त्यांचा आखाडा बनला आहे,’ असे निषेधदर्शक फलक हातात घेऊन महिला व पुरुष ग्रामपंचायत अधिकारी या मूक मोर्चानंतर जिल्हाधिकारी तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना भेटले. - १४-१ विविध मागण्या शिष्टमंडळाच्या निवेदनात म्हटले आहे, की ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न शासनाने गांभीर्याने घ्यावा. पी. एन. पाटील यांच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करून हा खटला जलदगती न्यायालयात चालवावा. तसेच वर्षातून १० ते १२ ग्रामसभांऐवजी केवळ एकच ग्रामसभा घ्यावी, संवेदनशील ग्रामसभांना विनामूल्य पोलिस संरक्षण द्यावे, ग्रामसभेचे बेकायदेशीर चित्रीकरण करणाऱ्यांवर बंदी आणावी. कृषी, आरोग्य आणि समाजकल्याण विभागांच्या विशेष ग्रामसभांची जबाबदारी संबंधित विभागांवर सोपवावी आणि वैयक्तिक लाभाच्या योजनांच्या लाभार्थी निवडीची प्रक्रिया पंचायत समिती स्तरावर पारदर्शकपणे राबवावी. शिवाय उडाणे (ता. धुळे ), झेंडेअंजन व नवे लोंढरे (ता. शिरपूर) ग्रामपंचायतींमधील प्रकरणांतील दोषींवरही तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी युनियनतर्फे करण्यात आली. -

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Municipal Corporation : कोल्हापूर महापालिकेच्या बैठकीत शारंगधर देशमुख- आदिल फरास यांच्यात जोरदार वाद; पालिकेच्या दारात कार्यकर्ते एकवटले

Shahajibapu Patil : ‘आम्ही उष्टे खाणारे नाही; तुमचे तुम्हाला राहू द्या’; सरकारने मराठा आरक्षणाबाबत तत्काळ निर्णय घ्यावा

Mhada House: म्हाडाचा गेमचेंजर निर्णय! विक्रीविना पडलेल्या घरांचा होणार 'असा' वापर; सर्वसामान्यांसाठी मोठी संधी

Marathi News Live Updates : एसआरपीएफ जवानाकडून गोळी झाडून आयुष्य संपवण्याचा प्रयत्न, मानेत गोळी लागल्याने प्रकृती चिंताजनक

Modi Cabinet Reshuffle : केंद्रिय मंत्रीमंडळात फेरबदल? महाराष्ट्रातील 'या' नेत्यांचा पत्ता कट होणार?, संभाव्य नावे समोर

SCROLL FOR NEXT