नाशिक

धुळे तरुणाला बेड्या

CD
धुळे ः टुडे १ साठी -- फोटो क्रमांक ः 28489 धुळे : जप्त गावठी कट्टा, काडतुसासह पकडलेला संशयित तरुण आणि कारवाई करणारे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक. - गावठी कट्ट्यासह तरुणाला बेड्या - स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; उमर्टीहून शस्त्र खरेदीची कबुली सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. १ : दहशत माजविण्याच्या उद्देशाने विनापरवाना गावठी कट्टा व जिवंत काडतूस बाळगणाऱ्या ३६ वर्षीय तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने वलवाडी परिसरातून गजाआड केले. मंजूर शाह डबू शाह (रा. गवळीवाडा, मोगलाई, धुळे) असे संशयिताचे नाव आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने वलवाडी येथील जय संतोषी माता कॉलनीजवळ नदीकाठच्या पुलाशेजारील रस्त्यावर सापळा रचून ही कारवाई केली. संशयिताकडून ४० हजार किमतीचा देशी गावठी कट्टा (पिस्टल) मॅग्झीनसह आणि एक हजार किमतीचे जिवंत काडतूस असा एकूण ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियम कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौकशीदरम्यान संशयिताने सुमारे दीड वर्षापूर्वी मध्य प्रदेशातील उमर्टी येथून हे शस्त्र खरेदी केल्याची कबुली दिली आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलिस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, सहायक पोलिस निरीक्षक दीपक ढोके तसेच अंमलदार आरीफ पठाण, राहुल सानप, शिरीष भदाणे, प्रकाश सोनार, संदीप पाटील, देवेंद्र ठाकूर, आशिषकुमार वानखेडे यांच्या पथकाने केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Municipal Corporation : कोल्हापूर महापालिकेच्या बैठकीत शारंगधर देशमुख- आदिल फरास यांच्यात जोरदार वाद; पालिकेच्या दारात कार्यकर्ते एकवटले

Shahajibapu Patil : ‘आम्ही उष्टे खाणारे नाही; तुमचे तुम्हाला राहू द्या’; सरकारने मराठा आरक्षणाबाबत तत्काळ निर्णय घ्यावा

Mhada House: म्हाडाचा गेमचेंजर निर्णय! विक्रीविना पडलेल्या घरांचा होणार 'असा' वापर; सर्वसामान्यांसाठी मोठी संधी

Marathi News Live Updates : एसआरपीएफ जवानाकडून गोळी झाडून आयुष्य संपवण्याचा प्रयत्न, मानेत गोळी लागल्याने प्रकृती चिंताजनक

Modi Cabinet Reshuffle : केंद्रिय मंत्रीमंडळात फेरबदल? महाराष्ट्रातील 'या' नेत्यांचा पत्ता कट होणार?, संभाव्य नावे समोर

SCROLL FOR NEXT