धुळे ः टुडे १ साठी
--
धुळ्यात २८ लाखांचा अपहार;
पेट्रोलपंप व्यवस्थापकावर गुन्हा
-
खोटा हिशेब दाखवून कागदपत्रेही लांबविली
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १ : शहरातील वाडीभोकर रोडवरील क्षिरे कॉलनीजवळील श्री स्वामी समर्थ पेट्रोलियम या पेट्रोल पंपावरील इंधन विक्रीतून जमा झालेल्या रकमेचा खोटा हिशोब दाखवून, तसेच रोख रक्कम आणि हिशोबाची कागदपत्रे परस्पर लांबवीत तब्बल २८ लाख ५८ हजार ७७४ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी व्यवस्थापकाविरुद्ध पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत व्यापारी जयेश खुमानसिंग ठाकूर (वय ४६, रा. जळगाव) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार विशाल पाटील (रा. दंडेवाले बाबा नगर, मोहाडी, धुळे) हा संशयित क्षिरे कॉलनीजवळील श्री स्वामी समर्थ पेट्रोलियम येथे व्यवस्थापक म्हणून कामास होता. पेट्रोल पंपावर इंधन विक्रीतून जमा होणाऱ्या रकमेचा हिशोब ठेवणे आणि ती बँकेत भरण्याची सर्व मदार त्याच्यावरच होती.
दरम्यान, संशयिताने १ जानेवारी ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत पेट्रोल विक्रीतून मिळालेल्या रकमेपैकी २६ लाख ३९ हजार ७०० रुपयांचा अपहार केल्याचे उघडकीस आले आहे. त्याने कॅशबुक तसेच बँक भरणा स्लिपवर खोटी आकडेवारी नमूद करून व्यवस्थापनाची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याशिवाय गतवर्षी ३० ऑगस्टला रात्री दहानंतर त्याने पंपाच्या कार्यालयातील कपाटात असलेली २ लाख १६ हजार ७४ रुपयांची रोख रक्कम आणि कॅशबुकसह बँक भरणा स्लिपची महत्त्वाची कागदपत्रे बळकावून पळ काढला. या प्रकरणी विशाल पाटील याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.