धुळे ः टुडे १ साठी
--
फोटो क्रमांक ः 28495
धुळे : एलसीबीने जप्त केलेल्या तलवारीसह संशयित तरुण व कारवाई करणारे पोलिस पथक.
--
दहशतीसाठी तलवार बाळगणारा गजाआड
-
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १ : परिसरात दहशत माजविण्याच्या उद्देशाने बेकायदेशीररीत्या तलवार बाळगणाऱ्या २४ वर्षीय तरुणास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गजाआड केले. राहुल भीमराव अहिरे (रा. न्याहोळद, ता. धुळे) असे संशयिताचे नाव आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना ३१ ऑगस्टला मिळालेल्या माहितीनुसार बिलाडी-न्याहोळद रोडवरील इंडियन ऑइल पेट्रोल पंपाजवळील मोकळ्या जागेत झाडाजवळ ही कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान संशयित राहुल अहिरे याच्याकडून सुमारे दोन हजार रुपये किमतीची २६ इंच लांब तलवार जप्त करण्यात आली. याप्रकरणी सोनगीर पोलिस ठाण्यात शस्त्र अधिनियम कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक विशाल आनंद व अपर पोलिस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक वारे, सहायक पोलिस निरीक्षक दीपक ढोके, तसेच अंमलदार राहुल सानप, देवेंद्र ठाकूर, शिरीष भदाणे, प्रकाश सोनार, संदीप पाटील, आशिषकुमार वानखेडे यांच्या पथकाने केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.