NSK26H28497
नंदुरबार : उपजिल्हाधिकारी उषाराणी देवगुणे यांना निवेदन देताना संघटनेचे जिल्हाध्यक्ष दौलत कोकणी, जिल्हा सरचिटणीस गणेश मोरे व पदाधिकारी.
----
ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचा
नंदुरबारात मुकमोर्चा
सकाळ वृत्तसेवा
नंदुरबार, ता. १ : कर्तव्यावर असताना ग्रामपंचायत अधिकाऱ्यावर होणारे हल्ले. त्यामुळे निर्माण झालेला सुरक्षिततेचा प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी (ता. १) नंदुरबार जिल्हा परिषद ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनिअन डीएनई- १३६ या संघटनेतर्फे मूकमोर्चा काढण्यात आला. त्यात ग्रामपंचायत अधिकारी, सरपंच सहभागी झाले होते.
जळगाव जिल्ह्यातील शिवरे येथे ग्रामसभेत (कै.) पी. एन. पाटील यांना त्रासाला सामोरे जावे लागले. या घटनेमुळे ग्रामपंचायत अधिकाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेच्या निषेधार्थ राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनिअनच्या राज्य कार्यकारिणीच्या आदेशानुसार, नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी ग्रामसभा कामकाजावर बहिष्कार टाकला आहे. लढा तीव्र करण्यासाठी मंगळवारी जिल्हा परिषद ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मूकमोर्चा काढण्यात आला. जिल्हा परिषद आवारात ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचे पदाधिकारी व सरपंच यांनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर मूकमोर्चा नेला व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
मूकमोर्चामध्ये सरपंच संघटना, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ, जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या सर्व संवर्ग संघटना, सर्व ग्रामपंचायत अधिकारी संघटना यांनी पाठिंबा दिला होता. (कै.) पी. एन. पाटील यांना श्रद्धांजली वाहून मूकमोर्चाची सांगता झाली. मूकमोर्चा यशस्वी करण्यासाठी जिल्हाध्यक्ष दौलत कोकणी, जिल्हा सरचिटणीस गणेश मोरे व संघटनेचे जिल्हा व तालुका कार्यकारिणीने प्रयत्न केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.