(दोन कॉलम बातमी आजच घ्यावी)
NSK26H28505
पाळधी (ता.धरणगाव) : रक्षाबंधन सोहळ्यात सहभागी दृष्टीहीन, दिव्यांग व अनाथ भगिनींसह जीपीएस मित्र परिवारातील भाऊ.
-----------------------
विशेष भगिनींनी बांधली
जीपीएस परिवाराला राखी
----
रक्षाबंधनातून जपले माणुसकीचे नाते
सकाळ वृत्तसेवा
पाळधी/जळगाव, ता.१ : रक्षाबंधन म्हणजे भाऊ-बहिणीच्या नात्याचा उत्सवासोबत प्रेम, विश्वास, आपुलकी व आयुष्यभर एकमेकांच्या पाठीशी उभे राहण्याचा भावनिक धागा. याच धाग्याला सामाजिक बांधिलकीची जोड देत पाळधी (ता.धरणगाव) येथे दृष्टीहीन, दिव्यांग व अनाथ भगिनींसोबत जीपीएस मित्र परिवाराने ‘अतूट धागा मायेचा’ हा आगळावेगळा रक्षाबंधन सोहळा साजरा केला.
राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रताप पाटील यांच्या संकल्पनेतून जीपीएस मित्र परिवाराच्या माध्यमातून हा रक्षाबंधन सोहळा घेण्यात आला. या सोहळ्यात दृष्टीहीन, दिव्यांग व अनाथ भगिनींना सन्मानाने सहभागी करून घेत त्यांच्याकडून जीपीएस परिवारातील भावांच्या मनगटावर राखी बांधून औक्षण करून घेत क्षणभरात रक्ताच्या नात्यापलिकडचे मायेचे नाते जुळले. भगिनींच्या चेहऱ्यावर फुललेला आनंद व उपस्थितांच्या डोळ्यांत दाटलेले भाव या सोहळ्याला अधिक हृदयस्पर्शी बनवून गेले.
त्यांच्या सुख-दुःखात व गरजेच्या प्रत्येकप्रसंगी जीपीएस परिवार सोबत राहील, अशी ग्वाहीही यावेळी देण्यात आली. ‘राखी केवळ मनगटावर बांधली जात नाही, ती माणसाला माणसाशी जोडते,’ याची अनुभूती या सोहळ्यात आली. त्यामुळे हा संवेदनशील उपक्रम जिल्ह्यात व उपस्थितांसाठीही अविस्मरणीय ठरला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.