नाशिक

आर्ट असोसिएट्सच्या संकल्पनेतून रंगला कृष्ण जन्मोत्सव सोहळा

CD
पान चार --------------------- 28504 नाशिक : आर्ट असोसिएट्सच्या संकल्पनेतून महाकवी कालिदास कलामंदिरात साकारलेल्या या प्रयोगाने उपस्थित रसिकांना कृष्णचरित्राची वेगळी अनुभूती दिली. नाशिकमध्ये रंगला कृष्ण जन्मोत्सव सोहळा कथ्थक, भरतनाट्यम आणि एआय तंत्रज्ञानाचा अनोखा मिलाफ सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २ : कृष्णाच्या विविध रूपांचे दर्शन घडवत कथ्थक, भरतनाट्यम, संगीत, कथन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अनोखा मिलाफ साधणारा कृष्ण जन्मोत्सव सोहळा महाकवी कालिदास कलामंदिरात रंगला. आर्ट असोसिएट्सच्या संकल्पनेतून साकारलेल्या या प्रयोगाने उपस्थित रसिकांना कृष्णचरित्राची वेगळी अनुभूती दिली. कृष्णाच्या जीवनातील विविध प्रसंगांना समकालीन दृष्टिकोनातून सादर आर्ट असोसिएट्सने सादर केले.पुण्याच्या नादरूप संस्थेच्या कथ्थक नृत्यांगनांनी नृत्याविष्कार सादर केला. विदुषी शमा भाटे यांच्या तालमीत तयार झालेल्या ११ तरुणी आणि एका तरुणाने कालिया दमन, माखन चोरी, गोपी वस्त्रहरण आदी प्रसंग नृत्याच्या माध्यमातून सादर केले. या प्रसंगांमधून कृष्णाचे विविध पैलू आणि त्यातून मिळणारा जीवनबोध उलगडण्यात आला. अमीरा पाटणकर, श्रद्धा मुखडे, श्रेया कुलकर्णी आणि प्रमोद वाघ यांच्यासह कलाकारांनी उत्कृष्ट नृत्याविष्कार सादर केला. ‘कृष्ण द लिबरेटर’चे संगीत केदार पंडित यांनी केले असून सचिन खेडेकर यांच्या स्वरात होते. ध्वनी नियोजन पुष्कर जोशी, तर प्रकाशयोजना विनोद राठोड यांनी केली. भरतनाट्यम गुरू शिल्पा देशमुख आणि त्यांच्या सृजनानंदच्या विद्यार्थिनींनी हा नृत्याविष्कार साकारला. प्रारंभी दीपप्रज्वलन महापौर हिमगौरी आडके यांच्या हस्ते झाले. यावेळी ॲड. नितीन ठाकरे, डॉ. राज नगरकर, रश्मी हिरे, डीसीपी चव्हाण, शाहू खैरे, अजय बोरस्ते, डॉ. हेमलता पाटील आणि रश्मी हिरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन कल्पेश कुलकर्णी यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shiv Sena Case Supreme Court : शिंदेंच्या वकिलांच्या युक्तिवादात पहिल्याच वाक्यात बाळासाहेबांचं नाव, शिवसेनेच्या सुनावणीत जबरदस्त क्लायमॅक्स?

Driverless Car Crash in Islamabad : पाकिस्तानी जुगाडाचा फज्जा! ड्रायव्हरलेस कारची टेस्टिंग महागात; थेट पोलीस व्हॅनला धडक अन्... VIDEO VIRAL

Physiotherapy: आता फिजिओथेरपी फक्त उपचारांपर्यंतीच मर्यादित नाही! फिटनेस अन् दीर्घकालीन आरोग्यासाठीही ठरतेय महत्त्वाची

Marathi News Live Updates : उद्धव ठाकरे गटातील मुंबईच्या नगरसेविका विशाखा राऊत यांचे नगरसेवक पद रद्द

ENG vs PAK: निर्लज्ज कुठला! इंग्लंडकडून लाजीरवाणा पराभव अन् रिझवान दात काढत होता... नेटिझन्सन खळवले; Viral Video

SCROLL FOR NEXT