नाशिक

आदिवासी विद्यार्थ्यांच्या मोर्चाने वाहतुकीचा खोळंबा

CD
पान तीन ----------------- 28488, 28487 नाशिक : शहरात मंगळवारी कोंडीत अडकलेले वाहनचालक. दुसऱ्या छायाचित्रात वाहतुक सुरळीत करताना पोलिस. मोर्चाने वाहतुक कोंडी; पोलिसांची तारांबळ नाशिक, ता. १ : आदिवासी विकास भवनावर आदिवासी विद्यार्थ्यांनी प्रलंबित मागण्यासाठी मंगळवारी (ता.१) मोर्चा काढला. या मोर्चामुळे त्र्यंबक नाका, शालिमार, सीबीएस, अशोकस्तंभ याठिकाणी वाहतुकीची कोंडी पहावयास मिळाली. मोर्चा आदिवासी विकास भवनसमोर स्थिरावल्यानंतर सीबीएस ते अशोकस्तंभ रोडवरील वाहतूक सुरळीत झाली. तर गडकरी सिग्नल ते त्र्यंबक नाका सिग्नल दुतर्फा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात येऊन पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात आली. मोर्चावेळी वाहतूक सुरळीत करताना वाहतूक पोलिसांचा ताफा तैनात असला तरी तारांबळ झाली. आदिवासी विद्यार्थ्यांच्या उलगुलान मोर्चाला गोल्फ क्लब मैदानापासून सुरू झाली. मोर्चा त्र्यंबक नाका, खडकाळी सिग्नल, शालिमारमार्गे एमजी रोड, मेहेर सिग्नल, जिल्हाधिकारी कार्यालयासमोरून सीबिएस सिग्नल, त्र्यंबक नाका येथून आदिवासी विकास भवनसमोर मोर्चा आला. मोर्चात हजारो विद्यार्थ्यांचा उस्फूर्त सहभाग असल्याने शहरातील मुख्य रस्त्यांवर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. मोर्चा मार्गस्थ होत असताना त्र्यंबकरोडकडून येणारी व जाणारी वाहतूक खोळंबली. तसेच, सिबीएस चौकातही अशीच परिस्थिती होती. दुपारनंतर वाहतूक सुरळीत झाली. तर गडकरीकडून येणारी वाहतूक चांडक सर्कलमार्गे तर, त्र्यंबक नाक्याकडून येणारी वाहतूक खडकाळी सिग्नलमार्गे वळविण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loose Oil Sale Maharashtra : मोठा निर्णय! देवेंद्र फडणवीसांकडून तुकाराम मुंढेंच्या आदेशाला केराची टोपली? सुटे खाद्यतेल विक्रीला परवानगी

कर्जाचा तगादा, पतीसह पत्नीने उचललं टोकाचं पाऊल; पलूस तालुका हादरवणारी घटना

FDA Action : ‘ब्लिंक कॉमर्स’चा परवाना निलंबित! अस्वच्छतेच्या त्रुटी कायम; अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

Marathi News Live Updates : सावरगाव परिसरात वन्यजीवांच्या शिकारीचा प्रयत्न, दोन आरोपी फरार; बंदुकीसह दुचाकी जप्त

Pune News : चारच्या पुढे बेस-टॉप असल्यास गुन्हा दाखल होणार; साऊंड सिस्टिम जप्त करण्याचा पोलिसांचा इशारा

SCROLL FOR NEXT