नाशिक

रणजितसिंह राजपूत नियुक्त

CD
धुळे ः टुडे १ साठी -- फोटो क्रमांक ः 28507....रणजीतसिंह राजपूत -- जिल्हा माहिती अधिकारीपदी रणजितसिंह राजपूत नियुक्त - सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. १ : जिल्हा माहिती अधिकारी पदाचा कार्यभार रणजितसिंह राजपूत यांनी स्वीकारला. यापूर्वी ते नंदुरबार येथे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून कार्यरत होते. माहिती व जनसंपर्क क्षेत्रात दीर्घ अनुभव असलेले श्री. राजपूत यांनी वृत्तपत्र व जनसंज्ञापन, विधी तसेच राज्यशास्त्र या विषयांत पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. कारकिर्दीत त्यांनी मुंबईतील एड्स नियंत्रण प्रकल्पात उपसंचालक (आयईसी), देना बँकेत व्यवस्थापक (जनसंपर्क), मंत्रालय वृत्त शाखेत कार्य अधिकारी तसेच अमरावती व नाशिक येथे विभागीय माहिती कार्यालयात सहाय्यक संचालक म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. याशिवाय त्यांनी नाशिक, नंदुरबार आणि धुळे येथे यापूर्वीही जिल्हा माहिती अधिकारी म्हणून सेवा बजावली आहे. माहिती व जनसंपर्क यंत्रणेत आधुनिक तंत्रज्ञानाचा समन्वय साधण्यावर त्यांचे विशेष प्राधान्य असून, त्यांच्या कार्यकाळात नंदुरबार येथे राज्यातील पहिले ‘मॉडेल जिल्हा माहिती कार्यालय व बहुमाध्यम केंद्र’ साकारले गेले. तसेच, धुळे येथे त्यांच्या संकल्पनेतून उभे राहिलेले राज्यातील पहिले ‘माहिती व जनसंपर्क भवन’ शासनाने संपूर्ण राज्यासाठी स्वीकारले. शासकीय जनसंपर्कासाठी देशातील पहिल्या शासकीय डिजिटल साप्ताहिक ‘यशार्थ’ची निर्मिती केल्याबद्दल २०१८ मध्ये नागरी सेवा दिनानिमित्त त्यांचा विशेष सन्मान झाला होता. शासकीय योजनांची माहिती नागरिकांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचवणे आणि जिल्ह्यातील विकासात्मक, सामाजिक व सांस्कृतिक बाबींना आधुनिक माध्यमांच्या साहाय्याने व्यापक प्रसिद्धी देणे यास आपले प्राधान्य राहील, असे श्री. राजपूत यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis meets Anna Hazare : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अण्णा हजारेंच्या भेटीला; महिनाभरापासून ताप आणि जुलाबाचा त्रास, बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार

माजी माओवादी नेता भूपतीवर मोठी जबाबदारी; विद्यापीठात समन्वयक म्हणून करणार मार्गदर्शन

Eknath Shinde Delhi Visit : एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौरावर; धनुष्यबाण चिन्ह गोठणार?, मुलगा श्रीकांत शिंदेंना मंत्रीमंडळात संधी मिळणार?

Marathi News Live Updates : सावरगाव परिसरात वन्यजीवांच्या शिकारीचा प्रयत्न, दोन आरोपी फरार; बंदुकीसह दुचाकी जप्त

Ranji Trophy: शार्दुल ठाकूरला कर्णधारपदावरून काढलं, मग नवा कॅप्टन कोण? मुंबई क्रिकेटचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT