नाशिक

रघुवंशी महाविद्यालयात राष्ट्रीय पोषण सप्ताहाच्या थीमचे उद्घाटन

CD
NSK26H28515 नंदुरबार : पोषण आहार सप्ताहाच्या उद्‍घाटनाप्रसंगी उपस्थित डॉ. एम. एस. रघुवंशी, प्रभारी प्राचार्य भूषण ठोंबरे, प्रा. योगिनी सपकाळे, प्रा. अंजली तडवी व विद्यार्थी. --- विमलताई रघुवंशी महाविद्यालयात राष्ट्रीय पोषण सप्ताहाचे उद्‍घाटन नंदुरबार, ता. २ : नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित श्रीमती विमलताई बटेसिंग रघुवंशी कॉलेज ऑफ नर्सिंग येथे राष्ट्रीय पोषण सप्ताहाचे उद्‍घाटन करण्यात आले. ‘पोषक आहार-निरोगी जीवन’ हा उपक्रमाचा उद्देश आहे. कार्यक्रमास नंदुरबार तालुका विधायक समितीचे समन्वयक डॉ. एम. एस. रघुवंशी, प्रभारी प्राचार्य भूषण ठोंबरे, प्रा. योगिनी सपकाळे, प्रा. अंजली तडवी आदी उपस्थित होते. भूषण ठोंबरे यांनी राष्ट्रीय पोषण सप्ताह साजरा करण्यामागील उद्देश स्पष्ट केला. नर्सिंग विद्यार्थ्यांनी रुग्णसेवा करताना रुग्णांच्या आहाराकडे विशेष लक्ष देणे आवश्यक असून, रुग्णांना योग्य आहाराबाबत आरोग्य शिक्षणाच्या माध्यमातून मार्गदर्शन करावे, असे त्यांनी सांगितले. डॉ. एम. एस. रघुवंशी यांनी संतुलित व योग्य आहाराचे महत्त्व स्पष्ट केले. निरोगी जीवनासाठी योग्य आहाराची निवड आणि आरोग्याची योग्य काळजी घेण्याबाबत माहिती दिली. प्रा. शंकर वसावे यांनी राष्ट्रीय पोषण सप्ताहाची प्रस्तावना, उद्दिष्टे आणि महत्त्व स्पष्ट केले. सप्ताहात पोस्टर प्रदर्शन, आरोग्यदायी व पोषक आहाराबाबत जनजागृती, तसेच पथनाट्याच्या माध्यमातून पोषणविषयक संदेश देण्यात येणार आहे. नंदुरबार शहरातील विविध दवाखाने, तालुका विधायक समिती संचलित अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळांमध्ये जाऊन विद्यार्थी, रुग्ण व नागरिकांना आरोग्यदायी आहार आणि पोषणतत्त्वांविषयी मार्गदर्शन करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी पोषण व आहारशास्त्र विषयाचे विभागप्रमुख प्रा. शंकर वसावे, प्रा. संदीप हलोर, तसेच विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली. ज्ञानेश्वर बागूल व सुवर्णा गावित यांनी सूत्रसंचालन केले. सारिका पटले यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : आमची लढाई कोणत्याही नेत्याविरोधात नाही, आम्हाला कोणालाही टार्गेट करायचं नाही: विनोद पाटील

Physiotherapy: आता फिजिओथेरपी फक्त उपचारांपर्यंतीच मर्यादित नाही! फिटनेस अन् दीर्घकालीन आरोग्यासाठीही ठरतेय महत्त्वाची

ENG vs PAK: निर्लज्ज कुठला! इंग्लंडकडून लाजीरवाणा पराभव अन् रिझवान दात काढत होता... नेटिझन्सन खळवले; Viral Video

ऑपरेशनसाठी १४ वर्षे प्रतीक्षेत, AIIMSमध्ये नंबर येण्याआधी १६ वर्षीय मुलीचा मृत्यू; वडिलांचा मृतदेह घेण्यास नकार

Managutti Shivaji Maharaj Statue : छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवल्याचे प्रकरण! महत्त्वाचा साक्षीदारच गैरहजर; पोलिस उपनिरीक्षकाविरोधात वॉरंट जारी

SCROLL FOR NEXT