नाशिक

बँकिंग सेवांच्या वापरात आर्थिक शिस्त महत्वाची -डॉ. महेंद्र रघुवंशी

CD
NSK26H28517 नंदुरबार : आर्थिक साक्षरतेबाबत मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. महेंद्र रघुवंशी. शेजारी डॉ. एम. एस. रघुवंशी, डॉ. एम. आर. पाटील, डॉ. स्वप्नील मिश्रा आदी. --- आर्थिक साक्षरतेसाठी विद्यार्थ्यांनी बँकिंग ज्ञान आत्मसात करावे : डॉ. रघुवंशी सकाळ वृत्तसेवा नंदुरबार, ता. २ : आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी विद्यार्थ्यांनी बँकिंगविषयक मूलभूत ज्ञान आत्मसात करणे आवश्यक आहे. डिजिटल युगात बँकिंग सेवांचा वापर करताना आर्थिक शिस्त व सावधगिरी बाळगावी, असे आवाहन प्राचार्य डॉ. महेंद्र रघुवंशी यांनी केले. विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनात बँकिंगचे महत्त्व, बचत खात्याची आवश्यकता, सुरक्षित आर्थिक व्यवहार आणि आधुनिक बँकिंग सेवांचा योग्य वापर याबाबत त्यांनी माहिती दिली. येथील ग. तू. पाटील महाविद्यालयात वाणिज्य विभागातर्फे भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शनाखाली स्वाधार फिनेक्सेस संस्थेच्या सहकार्याने विद्यार्थ्यांसाठी वित्तीय व आर्थिक साक्षरता कार्यक्रम झाला. प्राचार्य डॉ. महेंद्र रघुवंशी अध्यक्षस्थानी होते. प्रमुख वक्ते जितेंद्र पाटील यांनी, बचत खाते, ई-केवायसी, डिजिटल बँकिंग, ऑनलाइन आर्थिक व्यवहार आणि ऑनलाइन फसवणूक टाळण्यासाठी घ्यावयाची खबरदारी याबाबत मार्गदर्शन केले. या वेळी उपस्थितांना अपघात विमा योजनेंतर्गत दोन लाखांपर्यंतचे विमा संरक्षण, तसेच नैसर्गिक कारणाने मृत्यू झाल्यास उपलब्ध विमा संरक्षण याबाबत माहिती देण्यात आली. याशिवाय विविध शासकीय योजनांची माहिती व त्यांचा लाभ घेण्याची प्रक्रिया विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आली. कार्यक्रमास संस्थेचे समन्वयक डॉ. एम. एस. रघुवंशी, उपप्राचार्य डॉ. एम. आर. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. स्वप्नील मिश्रा यांनी प्रस्तावना केली. डॉ. नेहा पाटील यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. अमोल पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. गायत्री रघुवंशी, प्रा. पूजा ठाकरे, प्रा. पिनल परदेशी, प्रा. शैलेश परदेशी, डॉ. डी. डी. गावित, प्रा. सचिन दातिर, प्रा. दारासिंग वळवी आणि प्रा. संग्राम पाडवी यांनी सहकार्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Krishnaraj Mahadik : मनसेच्या चोरांना भाजपच्या पोरांनी जशास तसं प्रत्युत्तर दिलं, भाजप युवा नेते कृष्णराज महाडिकांची मनसेला वॉर्निंग

Jalgaon Bypass Flyover Collapse : खर्च वाचविण्यासाठी वाहनधारकांच्या जिवाशी खेळ; अपघातांमागे 'बायपास'चे निकृष्ट काम; कंत्राटदारावर थेट गुन्हा दाखल

OBC Creamy Layer : केंद्र सरकारला झटका ! ओबीसी क्रिमी लेयरवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; UPSC सह १८ राज्यांतील भरतीवर परिणाम?

होलसेल बदलामागचं लॉजिक काय? Shahid Afridi ने पाकिस्तान संघाचे वाभाडे काढले; म्हणाला, ट्वेंटी-२० तील खेळाडू कसोटी संघात...

Marathi News Live Updates : अकलूज RTO कार्यालयात धक्कादायक प्रकार; चक्क स्वच्छतागृहाच्या जागेतच चहा-कॉफीची कँटीन

SCROLL FOR NEXT