NSK26H28491
जळगाव -भटके विमुक्त दिवसानिमित्त विद्यार्थ्यांचा सत्कार करताना मान्यवर.
---------
भटके विमुक्त दिवसानिमित्त सत्कार
जळगाव, ता.२ - इतर मागास बहुजन कल्याण विभागातर्फे मूळजी जेठा महाविद्यालय, जळगाव येथील सभागृहात ‘भटके विमुक्त दिवस’ कार्यक्रम झाला. भटके विमुक्त समाजाचा इतिहास, संघर्ष, सामाजिक विकासातील योगदान तसेच समाजातील विद्यार्थी व नागरिकांना शासनाच्या विविध योजनांची माहिती मिळावी, या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सेवानिवृत्त प्राचार्य मनोहर अंधाळे उपस्थित होते. प्रास्ताविकात सहायक संचालक विशाल राठोड यांनी भटके विमुक्त दिनाचे महत्त्व विशद केले. विभागाच्या शैक्षणिक, सामाजिक योजना व पायाभूत सुविधा निर्मितीसाठीच्या योजना व विविध उपक्रमांची माहिती उपस्थितांना दिली. यावेळी महाज्योती, वनार्टी तसेच वित्त व विकास महामंडळाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. या योजनांचा लाभ भटके विमुक्त समाजातील विद्यार्थी, युवक व नागरिकांनी घेऊन शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक प्रगती साधावी, असे आवाहन केले.
यावेळी विकास माळुकर यांनी भटके विमुक्त समाजाचा इतिहास, समाजाने केलेला संघर्ष आणि सामाजिक विकासातील योगदान याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी व भटक्या समाजातील लोककलावंतांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. तसेच शैक्षणिक, क्रीडा क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.