नाशिक

संगमरवरी श्री गणरायाची दशकभराची परंपरा

CD
NSK26H28524 जळगाव : श्री गर्जना मित्रमंडळाची संगमरवरी श्री गणरायाची आकर्षक मूर्ती. ---- संगमरवरी गणरायाची दशकभराची परंपरा श्री गर्जना मित्र मंडळ साकारतेय केशवनाथेश्वर मंदिराची हुबेहुब आरास सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २ : भक्तिमय देखावे आणि वैशिष्ट्यपूर्ण गणेशमूर्तीच्या परंपरेसाठी ओळखल्या जाणाऱ्या नवीपेठेतील श्री गर्जना मित्र मंडळातर्फे गणेशोत्सव २०२६ जल्लोषात साजरा करण्याची तयारी सुरू आहे. मंडळाच्या माहितीनुसार, जळगावातील एकमेव गणेश मंडळ म्हणून गेल्या नऊ वर्षांपासून जयपूर येथून तयार करून घेतलेल्या संगमरवरी श्रींच्या पर्यावरणपूरक मूर्तीची प्रतिष्ठापना केली जात आहे. यंदा या परंपरेचे दहावे वर्ष असून, भाविकांसाठी हे विशेष आकर्षण ठरणार आहे. दरवर्षी वेगवेगळ्या प्रसिद्ध देवस्थानांची हुबेहुब आरास साकारण्याची मंडळाची परंपरा आहे. यापूर्वी वैष्णोदेवी, पशुपतीनाथ, द्वारका आदी देवस्थानांच्या आरासी साकारण्यात आल्या आहेत. यंदा कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यातील कराडी गावातील केशवनाथेश्वर मंदिराची आरास साकारण्यात येणार आहे. महादेवाला समर्पित असलेले हे मंदिर गुहेत असून, दर्शनासाठी भाविकांना पाण्यातून जावे लागते. गुहेत नैसर्गिकरीत्या प्रकट झालेले स्वयंभू शिवलिंग असल्याची श्रद्धा आहे. वर्षभर पाण्याने भरलेल्या या गुहेत गुडघ्यापासून कमरेपर्यंतच्या पाण्यातून चालत भाविक दर्शन घेतात. याच वैशिष्ट्याचा प्रत्यक्ष अनुभव जळगावातील भाविकांना देखाव्याच्या माध्यमातून देण्याचा मंडळाचा प्रयत्न आहे. चौकट मंडळाची अशी आहे कार्यकारिणी गणेशोत्सवाच्या नियोजनासाठी मंडळाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून, अध्यक्षपदी रिकू चौधरी, उपाध्यक्ष योगेश सोनवणे, सचिव सागर पाटील, खजिनदार सागर व्यास, तर सल्लागार म्हणून कुणाल मेतकर यांची निवड करण्यात आली आहे. मंडळाचे सदस्य म्हणून मुकेश पाटील, शैलेश अभंगे, ॲड. अविनाश महिरे, अमोल जैन, महेश कापसे, दीपक सोनवणे, चेतन मालुसरे आणि हितेश रवींद्र जावळे कार्यरत राहणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'ऑपरेशन सिंदूर'च्या नायकाकडे राम मंदिराची जबाबदारी, निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा ट्रस्टचे नवे CEO

Dilip Walse Patil : डिंभे-माणिकडोह बोगद्याला विरोध कायम; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सकारात्मक भूमिका, 'थोडा वेळ देऊ, त्यानंतर पुढील रणनीती ठरवू'

Mumbai Sawantwadi Express : आजपासून मुंबई-सावंतवाडी रोजची एक्स्प्रेस धावणार! सीएसएमटी येथे मुख्यमंत्री फडणवीस दाखवणार हिरवा झेंडा

मुकेश अंबानींची रिलायन्स आता आईस्क्रीमही बनवणार, अवघ्या १० रुपयांत लाँच केले प्रॉडक्ट, दिग्गज कंपन्याची उडाली झोप

Gokulashtami 2026: मोरपीस ते बासरी! जन्माष्टमीआधी घरात 'या' ५ वस्तू आणणे मानले जाते अत्यंत शुभ; जाणून घ्या वास्तू नियमावली..

SCROLL FOR NEXT