नाशिक

अनेक वर्षांनंतर मनपा कर्मचाऱ्यांच्या खात्यात १ तारखेलाच पगार

CD
(मनपा इमारतीचा फोटो वापरता येईल) --- मनपा कर्मचाऱ्यांचे एक तारखेलाच पगार आयुक्तांच्या प्रयत्नांनी अनेक वर्षांनंतर दिलासा; करवसुलीला वेग सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २ : गेल्या पाच ते सात वर्षांच्या प्रतीक्षेनंतर जळगाव महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या खात्यावर महिन्याच्या पहिल्याच दिवशी पगार जमा झाला आहे. ऑगस्ट महिन्याचा पगार १ सप्टेंबरलाच झाल्याने महापालिका कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून, आर्थिक अडचणींच्या काळात वेळेवर वेतन मिळाल्याने कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. महापालिकेची आर्थिक परिस्थिती गेल्या अनेक वर्षांपासून बिकट राहिली आहे. उत्पन्नाच्या तुलनेत आस्थापना खर्च, विविध विकासकामे आणि प्रशासकीय खर्चाचा ताळमेळ साधताना प्रशासनाची दमछाक होत होती. परिणामी काही वर्षांपूर्वी कर्मचाऱ्यांचे वेतन एक ते दोन महिन्यांनी रखडण्याच्या घटना घडत होत्या. त्यानंतर परिस्थितीत काहीशी सुधारणा झाली असली तरी पगाराची तारीख निश्चित राहिलेली नव्हती. दर महिन्याला पगार होत असला तरी तो अनेकदा १० तारखेनंतरच कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा होत असे. उशिरा पगारामुळे अडचण पगाराला होणाऱ्या विलंबाचा थेट परिणाम कर्मचाऱ्यांच्या कौटुंबिक अर्थकारणावर होत होता. गृहकर्ज, वाहनकर्ज, वैयक्तिक कर्जांचे हप्ते तसेच घरखर्च, मुलांचे शैक्षणिक शुल्क यांचे नियोजन बिघडत होते. उत्पन्नवाढीवर भर मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून आयुक्त आदित्य जिवने यांनी महापालिकेच्या उत्पन्नवाढीवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. थकीत मालमत्ता कराची वसुली, व्यापारी संकुलातील गाळेभाडे व इतर करांची वसुली, पाणीपट्टी तसेच विविध परवाने व शुल्कांच्या माध्यमातून महसूल वाढविण्यावर भर देण्यात आला आहे. थकीत देयकांच्या वसुलीसोबतच प्रशासकीय कामकाजात शिस्त आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच महापालिकेच्या उत्पन्नाचे प्रमुख स्रोत असलेल्या मालमत्ता कर, पाणीपट्टी, गाळेभाडे, बांधकाम परवाने व विकास शुल्क, जाहिरात शुल्क, विविध परवाने आणि इतर सेवा शुल्कांच्या वसुलीला गती देण्यात आल्याने महसूल प्रवाह सुधारण्यास मदत होत आहे. त्यातून कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेत करण्याला प्राधान्य देणे शक्य झाले आहे. चौकट कर्मचाऱ्यांमधून समाधान महिन्याच्या पहिल्याच दिवशी पगार झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. नियमित आणि वेळेवर वेतनाची ही पद्धत कायम राहावी, अशी अपेक्षाही कर्मचाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'ऑपरेशन सिंदूर'च्या नायकाकडे राम मंदिराची जबाबदारी, निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा ट्रस्टचे नवे CEO

Dilip Walse Patil : डिंभे-माणिकडोह बोगद्याला विरोध कायम; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सकारात्मक भूमिका, 'थोडा वेळ देऊ, त्यानंतर पुढील रणनीती ठरवू'

Mumbai Sawantwadi Express : आजपासून मुंबई-सावंतवाडी रोजची एक्स्प्रेस धावणार! सीएसएमटी येथे मुख्यमंत्री फडणवीस दाखवणार हिरवा झेंडा

मुकेश अंबानींची रिलायन्स आता आईस्क्रीमही बनवणार, अवघ्या १० रुपयांत लाँच केले प्रॉडक्ट, दिग्गज कंपन्याची उडाली झोप

Gokulashtami 2026: मोरपीस ते बासरी! जन्माष्टमीआधी घरात 'या' ५ वस्तू आणणे मानले जाते अत्यंत शुभ; जाणून घ्या वास्तू नियमावली..

SCROLL FOR NEXT