नाशिक

शैक्षणिक पॅडचे वाटप

CD
धुळे : टुडे पान ३ साठी --- फोटो क्रमांक : 28500 निमगूळ (ता. धुळे) : आमदार राम भदाणे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषदेतील शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक पॅड वाटपावेळी उपस्थित पदाधिकारी. --- निमगूळ गणात अकराशे शैक्षणिक पॅडचे वाटप आमदार राम भदाणे यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. २ : आमदार राम भदाणे यांच्या वाढदिवसानिमित्त ‘माझा नेता, माझा अभिमान- सेवा सप्ताह’ उपक्रमांतर्गत धुळे तालुक्यातील निमगूळ गण आणि बाबरे येथे विद्यार्थ्यांसाठी एक हजार शंभर शैक्षणिक पॅडचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना मिळावी आणि त्यांच्यामध्ये शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी, या उद्देशाने हा सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आला होता. ‘ज्ञानाची साथ, प्रगतीची वाट’ या संकल्पनेतून उपक्रम झाला. बाबरे येथील दगा चंद्रसिंग राजपूत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. या वेळी विद्यार्थ्यांच्या हातात शैक्षणिक साहित्य मिळाल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. कार्यक्रमाला बाबरेचे सरपंच प्रवीण राजपूत, विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष आनंदा भालेकर, विठ्ठल मराठे, पोलिसपाटील आनंदा गायकवाड, गोकुळ काळे, बबुतसिंग राजपूत, भाजपचे शाखाप्रमुख विनोद भालेकर, अमोल राजपूत, संभाजी भालेकर, योगेश राजपूत, पंकज राजपूत, अविनाश राजपूत, जितेंद्र राजपूत, आनंदा मोरे, आनंद राजपूत, नितीन मोरे, विशाल राजपूत, आबा रायसिंग मोरे, नर्सिंग मोरे, अमोल राजपूत आणि धामणगाव येथील राहुल पाटील यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्ते दिलीप सूर्यवंशी, प्रशांत पाटील आणि बोरी परिसरातील कार्यकर्त्यांनी संयोजन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati News : बारामतीच्या पूलावरील प्रकाशयोजनेस अमेरिकेतील पारितोषिक; नेहा दोशी यांच्या कामाची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल...

Marathi News Live Updates : लक्ष्मण हाकेंनी आंदोलन मागे घेतलं, बावनकुळेंशी फोनवरून चर्चा केल्यानंतर घेतला निर्णय

Nutrition Tips: व्हिटॅमिन D2 की D3? स्नायू अन् हृदयासाठी कोणते व्हिटॅमिन सर्वात उत्तम? ICMR च्या संशोधनातून मोठा खुलासा!

Krishna Janmashtami 2026: ४ की ५ सप्टेंबर? कृष्ण जन्माष्टमी नेमकी कधी? पाहा पूजा आणि पारणाची योग्य वेळ

मुंबईत ठाकरेंना मोठा धक्का, माजी महापौरांचं नगरसेवक पद रद्द; ६ वर्षे निवडणूकही लढता येणार नाही

SCROLL FOR NEXT