मेन फिचर पान ३
---
NSK26H28391 : जळगाव : मानराज पार्कजवळ महामार्गाचे सुरू असलेले काम.
--
NSK26H28546 : महामार्गावर दुसऱ्या बाजूने सुरू असलेली वाहतूक.
----
शीर्षक
पर्यायी रस्ते, वाहतूक नियंत्रणासाठी हवा अतिरिक्त बंदोबस्त
उपमहापौरांचे पोलिस अधीक्षकांना पत्र; महामार्गावरील कामामुळे अपघातांचा वाढला धोका
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २ : महामार्गाचा वळणरस्ता तसेच खोटेनगर व तापी परिसरात सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर झाला असून, गेल्या पंधरा ते वीस दिवसांत या परिसरात अंदाजे पाच ते सहा अपघात झाले आहे. त्यामुळे केवळ वाहतूक कोंडीचा प्रश्न राहिला नसून नागरिकांच्या जीविताच्या सुरक्षेचा गंभीर विषय निर्माण झाल्याबाबत उपमहापौर मनोज चौधरी यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांना पत्र दिले असून, तातडीच्या उपाययोजनांची मागणी केली आहे.
महामार्ग वळणरस्त्याचे काम सुरू असल्याने या मार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात शहरातून वळविण्यात आली आहे. त्यातच खोटेनगर व तापी परिसरातही रस्त्यांची कामे सुरू असल्याने उपलब्ध मार्ग अरुंद झाले आहेत. सध्या गणेशोत्सवाचे दिवस असल्याने या मार्गांवर वाहनांची वर्दळ आणखी वाढली आहे. परिणामी, दररोज मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असून नागरिक, वाहनधारक, विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
चौकट
पर्यायी रस्ते वाहतुकीसाठी खुले करा
या पार्श्वभूमीवर उपमहापौर चौधरी यांनी संबंधित विभाग व प्राधिकरणांशी समन्वय साधून तातडीच्या उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाामार्फत तयार करण्यात आलेला महामार्गाचा पर्यायी रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्याबाबत शहर वाहतूक शाखेमार्फत नियोजन करावे, अशी सूचना त्यांनी केली आहे. यामुळे मुख्य मार्गावरील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होईल.
नियंत्रणासाठी पोलिस कर्मचारी वाढवा
सकाळी व सायंकाळच्या गर्दीच्या वेळेत वाहतूक नियंत्रणासाठी या परिसरात अतिरिक्त वाहतूक पोलिस कर्मचारी नियुक्त करावेत, तसेच रस्त्याचे काम सुरू असलेल्या ठिकाणी पर्यायी मार्ग, एकेरी वाहतूक, वेगमर्यादा आणि रस्ता बंद असल्याच्या स्पष्ट सूचना देणारे फलक लावावेत, अशी मागणीही पत्रातून करण्यात आली आहे.
संयुक्त पाहणी गरजेची
रस्त्याच्या कामाच्या ठिकाणी लावण्यात आलेले बॅरिकेड्स योग्य पद्धतीने आहेत की नाहीत, वाहतुकीस पुरेशी जागा उपलब्ध आहे की नाही, याची वाहतूक शाखा व मनपा अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी करावी, तसेच अनधिकृत पार्किंग, हातगाड्या, अतिक्रमणे व वाहतुकीस अडथळा ठरणारे घटक तातडीने हटवावेत आणि रस्त्यांची कामे शक्य तितक्या लवकर पूर्ण करून वाहतूक पूर्ववत करण्यासाठी संबंधित यंत्रणेला सूचना द्याव्यात, अशी मागणी उपमहापौरांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.