नाशिक

भाजपाचे राहुल गांधींविरोेधात आंदोलन

CD
सूचना : फोटो विकी कदम देणार आहेत.... विरोधी पक्षनेते राहुल गांधींविरोधात भाजपची निदर्शने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन; प्रशासनाला निवेदन सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २ : महिलांना राजकीय क्षेत्रात अधिक प्रतिनिधित्व देतानाच निर्णय प्रक्रियेत त्यांचा सहभाग वाढविण्याच्या उद्देशाने लोकसभेत सादर केलेल्या नारीशक्ती वंदन अधिनियमनाविरोधात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेसने विरोधी भूमिका घेतली. या भूमिकेच्या निषेधार्थ भाजपने बुधवारी (ता. २) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. या वेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदन देण्यात आले. विरोधी पक्षनेते गांधी नाशिकच्या दौऱ्यावर असताना भाजपने त्यांच्या विरोधात आंदोलन केले. पक्षातर्फे देण्यात आलेल्या निवेदनात महिलांच्या राजकीय सक्षमीकरणाला बळ देताना त्यांना सन्मान मिळावा. तसेच लोकसभा आणि विधानसभेत महिलांना ३३ टक्के प्रतिनिधित्व देणे हा नारीशक्ती अधिनियमाचा प्रमुख उद्देश आहे. महिलांचा राजकीय सहभाग वाढविणे हा कोणत्याही पक्षीय राजकारणापेक्षा व्यापक विषय आहे. महिलांना निर्णय प्रक्रियेत समान संधी मिळणे हा त्यांच्या सक्षमीकरणाचा भाग आहे. पण, काँग्रसेने या विधेयकाविरोधात भूमिका घेतल्याबद्दल निषेध करण्यात आला. या वेळी आंदोलनाकर्त्यांनी काळे कपडे परिधान करून तसेच हातावर काळ्या फिती बांधून निषेध केला. आंदोलनामध्ये महापौर हिमगौरी आडके, माजी केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार, आमदार देवयानी फरांदे, आमदार राहुल ढिकले, शहराध्यक्ष सुनील केदार, यतीन कदम, सुनील बच्छाव, गिरीश पालवे, रंजना भानसी, दीपाली गिते, स्वाती भामरे, छाया देवांग, माधुरी बोलकर, रूपाली ननावरे, सुजाता करजगीकर, प्रियंका माने यांच्यासह भाजप महिला पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. राहुल गांधी ‘गो बॅक’ आंदोलनावेळी आंदोलनकर्त्यांनी ‘राहुल गांधी गो बॅक’चा नारा दिला. तसेच नारीशक्तीला विरोध करणाऱ्यांचा धिक्कार असो, ‘नारीशक्ती जिंदाबाद’, ‘महिला सशक्तीकरणाचा विजय असो, ‘नारीशक्ती वंदन अधिनियमाचा विजय असो’, ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ अशा घोषणा दिल्या. या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुकेश अंबानींची रिलायन्स आता आईस्क्रीमही बनवणार, अवघ्या १० रुपयांत लाँच केले प्रॉडक्ट, दिग्गज कंपन्याची उडाली झोप

Gokulashtami 2026: मोरपीस ते बासरी! जन्माष्टमीआधी घरात 'या' ५ वस्तू आणणे मानले जाते अत्यंत शुभ; जाणून घ्या वास्तू नियमावली..

Nutrition Week : वजन घटवण्यासाठी फायबर इतकं महत्त्वाचं का? AIIMSच्या डॉक्टरांनी सांगितलं ‘हे’ कारण

Manwat News : मानवत नगर परिषदेच्या सफाई कर्मचाऱ्यांचा ७ व्या दिवशीही कामबंद लढा कायम; तोडगा न निघाल्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव

Mumbai Rain Update: मुंबईचं हवामान अचानक बदललं, मुसळधार पावसाची सुरुवात; कसा असेल पुढील २ दिवसाचा अंदाज?

SCROLL FOR NEXT