नाशिक

५०० आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य

CD
28537 ------------------ ३०-२ पिंपळवटी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या मोफत साहित्य बालम बाबा फाउंडेशनतर्फे उपक्रम सुरगाणा, ता.३ ः पिंपळवटी (ता.पेठ) येथील लोकनेते सीताराम भोये अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेतील सुमारे ५०० विद्यार्थ्यांना बालम बाबा फाउंडेशनतर्फे स्कूल बॅग, शैक्षणिक साहित्य आणि खाऊचे वाटप करण्यात आले. डॉ. झाकीर शेख यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्यात आले. विद्यार्थिनींच्या आरोग्याची विशेष काळजी घेत सॅनिटरी नॅपकिनचेही वाटप करण्यात आले. फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. शेख यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी दहावीत पहिल्या पाच येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी अकरा हजार रुपये तसेच सर्वाधिक जास्त गुण असलेल्या विषय शिक्षकांना प्रत्येकी अकरा हजार रुपये बक्षीस जाहीर केले. शिक्षण, आरोग्य आणि मानवतेच्या सेवेला प्राधान्य देणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले. गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात देत त्यांच्या शैक्षणिक वाटचालीला बळ देण्याचे कार्य फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात आले. यावेळी बालम बाबा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. झाकीर शेख, सचिव महेश थोरात, संचालक राजाभाऊ खुळे, शरद खुळे, विकास बकरे, रोहित खुळे, हेमंत दिघोळे, अजीम खान, राजाभाऊ अहिरे, पिंपळवटीचे सरपंच पंडितराव भदाणे, अकील शेख, बजरंग कांबळे यांच्यासह विद्यालयाचे मुख्याध्यापक देवरे सर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते. मानवतेचा संदेश कृतीतून जपत विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविणारा बालम बाबा फाउंडेशनचा हा उपक्रम परिसरात कौतुकाचा विषय ठरला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidyanand Bapat: विद्यानंद बापट यांना २४ तास पोलिस सुरक्षा; पुण्याच्या पोलिस आयुक्तांनी स्पष्ट शब्दांत खडसावलं

MS Dhoni: एमएस धोनी इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळणार नाही; CSKच्या माजी खेळाडूने सांगितलं, ‘धोनीला पूर्णवेळ यष्टीरक्षक म्हणूनच खेळायचंय’

काव्यार्थचं बाळ पाहिलत का? ‘फर्स्ट लूक’ समोर; ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेचा प्रोमो पाहून चाहते म्हणाले...

बॅडमिंटन खेळताना क्षुल्लक वाद, ११ वर्षांच्या मुलानं खिशातून चाकू काढला; ९ वर्षीय मुलाचा मृत्यू, घटना CCTVत कैद

Marathi News Live Updates : विभागीय आयुक्त कार्यालयात सुनेत्रा पवारांची बैठक सुरु

SCROLL FOR NEXT