धुळे टुडे २ साठी अँकर...
---
फोटो-NSK26H28531
धुळे ः समर्पण मल्टिपल डिसॅबिलीटी रिहॅब सेंटरच्या पदाधिकाऱ्यांना आर्थिक मदतीचा धनादेश सुपूर्द करताना डॉ. एन. एम. जैन व मान्यवर.
---
‘समर्पण’ला एक लाख ११ हजारांचा धनादेश
जैन ट्रस्टची पाचव्यांदा मदत; विशेष गरजा असलेल्या मुलांना आधार
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. २ ः (कै.) रतिबाई मगनलाल जैन चॅरिटेबल ट्रस्टतर्फे समर्पण मल्टिपल डिसॅबिलिटी रिहॅब सेंटरला एक लाख ११ हजार रुपयांचा पाचवा धनादेश नुकताच देण्यात आला. समर्पण केंद्रात उपचार व पुनर्वसनासाठी येणाऱ्या सर्वसाधारण, तसेच दारिद्र्यरेषेखालील मुलांच्या थेरपीसाठी लागणाऱ्या खर्चातील तूट भरून काढण्यासाठी ही रक्कम देण्यात आली.
ट्रस्टचे विश्वस्त डॉ. एन. एम. जैन यांच्या हस्ते धनादेश सुपूर्द करण्यात आला. याप्रसंगी तेज ज्ञान फाउंडेशन-हॅपी थॉट्सच्या प्रशिक्षक मीना गंगवाल, सदस्य शारदा पाटील प्रमुख पाहुणे होते. (कै.) रतिबाई मगनलाल जैन चॅरिटेबल ट्रस्टचे जयंत शाह, प्रा. देवेंद्र डोंगरे, सूर्यप्रभा जैन, रोटरी क्लब अध्यक्ष मनोज लोढा, मातृसेवा ट्रस्टचे धनेंद्र गंगवाल आदी उपस्थित होते. डॉ. जैन यांनी (कै.) रतिबाई मगनलाल जैन चॅरिटेबल ट्रस्टतर्फे सुरू असलेल्या विविध सामाजिक व सेवाभावी उपक्रमांची माहिती दिली. सौ. पाटील व सौ. गंगवाल यांनी तेज ज्ञान फाउंडेशनच्या हॅपी थॉट्स उपक्रमाच्या कार्याची माहिती देत समर्पण केंद्राला भविष्यातही सातत्यपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. या वेळी तेज ज्ञान फाउंडेशनच्या सदस्यांनीदेखील समर्पण केंद्रासाठी १३ हजार रुपये देणगी दिली. प्रदीप शाह यांनी सूत्रसंचालन केले. अपूर्वा कुलकर्णी यांनी समर्पण केंद्राशी असलेला अनुभव उपस्थितांसमोर मांडला आणि केंद्राच्या कार्याचा मुलांच्या जीवनावर होणारा सकारात्मक परिणाम अधोरेखित केला. रोटरी चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त अनिल बंगड, रोटरीचे सदस्य महेश कुलकर्णी, उमेश अग्रवाल, आशीष अग्रवाल, चंद्रकांत चौधरी, सचिन पिंगळे, प्रणीत बंगड व रोटरॅक्टर वीरम शाह, तसेच समर्पण मल्टिपल डिसॅबिलिटी रिहॅब सेंटरचे थेरपिस्ट व कर्मचारी उपस्थित होते. विविध सेवाभावी संस्था, ट्रस्ट आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या सहकार्याने विशेष गरजा असलेल्या मुलांना दर्जेदार थेरपी व पूनर्वसन सेवा उपलब्ध करून देण्याच्या समर्पण केंद्राच्या प्रयत्नांना या सहकार्यामुळे अधिक बळ मिळाल्याच्या भावना मान्यवरांनी व्यक्त केल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.