NSK26H28542 (हा फोटो चार कॉलमात घ्यावा)
जळगाव : लोककलांचे संवर्धन व कलावंतांच्या हक्कांसाठी लढा देण्याच्या उद्देशाने खानदेश भटके विमुक्त लोककलावंत विकास परिषदेची नुकतीच स्थापना करण्यात आली, त्याप्रसंगी उपस्थित अध्यक्ष विनोद ढगे व कलावंत.
-----
भटके विमुक्त लोककलावंत विकास परिषद स्थापन
उपशीर्षक
खानदेशात लोककलांच्या संवर्धनाचा निर्धार; कलावंतांच्या हक्कांसाठी लढणार
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २ : आधुनिक युगातील बदलत्या जीवनशैलीमुळे पारंपरिक लोककला हळूहळू लोप पावत असून, विशेषतः भटक्या-विमुक्त समाजातील अनेक पारंपरिक लोककला नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. या लोककलांचे जतन तसेच लोककलावंतांच्या न्याय हक्कांसाठी लोककलावंत विकास परिषदेअंतर्गत खानदेश भटक्या-विमुक्त लोककलावंत विकास परिषदेची स्थापना करण्यात आली.
भटक्या विमुक्त दिनाच्या निमित्ताने खानदेश लोककलावंत विकास परिषदेचे अध्यक्ष शाहीर विनोद ढगे यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या बैठकीत या परिषदेची स्थापना करण्यात आली. यावेळी भराडी जोगी, नंदीबैलवाले, पिंगळा, किंगरी वादक, कुरमुरे जोशी, गोंधळी, वासुदेव, बहुरूपी तसेच शिवकालीन लोककला सादर करणारे लोककलावंत मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भटक्या-विमुक्त समाजातील लोककलावंत आजही गावोगावी पारंपरिक कला सादर करून उदरनिर्वाह करीत आहेत. मात्र आधुनिक मनोरंजनाची साधने, बदलती सामाजिक परिस्थिती आणि पारंपरिक कलांना मिळणारे अपुरे व्यासपीठ यामुळे या कलावंतांसमोर आर्थिक व सामाजिक अडचणी निर्माण झाल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर नव्याने स्थापन झालेली परिषद भटक्या-विमुक्त लोककलावंतांचे प्रश्न शासन दरबारी प्रभावीपणे मांडणार असून, त्यांच्या न्याय हक्कांसाठी व्यापक लढा उभारणार आहे.
----
(चौकट)
लोककलावंतांच्या हक्कांसाठी लढा
भटक्या समाजातील लोककला ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाची व परंपरेची ओळख आहे. ती जिवंत ठेवण्यासाठी लोककलावंत जगला पाहिजे आणि लोककलावंतांच्या न्याय हक्कासाठी संघटित ताकदीने संघर्ष केला पाहिजे, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
--------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.