धुळे टुडे २ साठी...
---
फोटो- NSK26H28550
धुळे ः राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या मध्यवर्ती बसस्थानकाला क्रांतिवीर खाज्या नाईक यांचे नाव द्यावे, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करताना बिरसा मुंडा क्रांती दलाचे पदाधिकारी, कार्यकर्ते.
---
मध्यवर्ती बसस्थानकाला
क्रांतिवीर खाज्या नाईक नाव द्या
बिरसा मुंडा क्रांती दलाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. २ ः राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाला आदिवासी स्वातंत्र्यसंग्रामाचे महानायक क्रांतिवीर खाज्या नाईक यांचे नाव द्यावे अशी मागणी बिरसा मुंडा क्रांती दलाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.
दररोज हजारो नागरिकांच्या संपर्कात येणाऱ्या मध्यवर्ती बसस्थानकाला क्रांतिवीर खाज्या नाईक यांचे नाव दिल्यास त्यांच्या शौर्याचा इतिहास संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत पोहोचण्यास मदत होईल. तसेच आदिवासी समाजाच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाला सार्वजनिक मान्यता मिळेल. यानिमित्ताने धुळे जिल्ह्याच्या गौरवशाली आदिवासी इतिहासाला योग्य सन्मान मिळेल, तसेच क्रांतिवीर खाज्या नाईक यांच्या शौर्याची गाथा नव्या पिढीपर्यंत पोहोचण्यास मदत होईल. त्यामुळे बसस्थानकाचे ‘क्रांतिवीर खाज्या नाईक मध्यवर्ती बसस्थानक, धुळे’ असे नामकरण करून त्याचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडे पाठवावा, तसेच बसस्थानकाच्या दर्शनी भागात खाज्या नाईक यांचा भव्य स्मृतिफलक उभारून त्यांच्या जीवनकार्याचा व अंबापाणीच्या लढाईतील आदिवासी वीरांच्या शौर्याचा इतिहास प्रदर्शित करावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. बिरसा मुंडा क्रांती दलाचे गोविंदा अहिरे, पवन वाघ, किशोर गायकवाड, नाना महाले, देवीदास सोनवणे, निशांत मोहिते, श्याम मोरे, अनंत भिल, आनंद गांगुर्डे, भटू नाईक, राकेश गायकवाड, बंटी वाघ, किशोर मोरे आदींनी मागण्यांचे निवेदन दिले. मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनेही केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.