नाशिक

विधायक कार्याची प्रचिती

CD
धुळे ः टुडे २ साठी --- फोटो क्रमांक ः 28541 धुळे ः गणेशोत्सवानिमित्त वंदे मातरम् प्रतिष्ठानच्या मंडप उभारणी कामाचे भूमिपूजन करताना यशवंत पाटील. शेजारी श्यामकांत बोरसे व पदाधिकारी. --- वंदे मातरम् प्रतिष्ठानच्या गणेशोत्सवाचे आकर्षण तरुणाईच्या विधायक कार्याची प्रचिती सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. २ ः विधायक कार्यासाठी संघटित झालेल्या साडेतीनशेहून अधिक तरुणांच्या सहभागातून देवपूरमधील इंदिरा गार्डन परिसरात कार्यरत असलेल्या नामांकित आणि राज्य शासन पुरस्कारप्राप्त वंदे मातरम् प्रतिष्ठानतर्फे यंदाही गणेशोत्सव थाटात साजरा केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवासाठी मंडप उभारणीच्या कामाचा बुधवारी (ता. २) श्रीफळ वाढवून भक्तिभावात प्रारंभ करण्यात आला. वंदे मातरम् प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभियंता श्यामकांत बोरसे, गिरीश मराठे, हरिश चौधरी, उमाकांत पाटील, नितीन पाटील, नीलेश राजपूत, डॉ. हेमंत भदाणे, प्रदीप पाटील, समीर पाटील, यशवंत पाटील, बंटी पाटील, गिरीश पाटील, सुशील बोरसे, डॉ. योगेश ठाकरे उपस्थित होते. वंदे मातरम् प्रतिष्ठान केवळ गणेशोत्सवापुरते मर्यादित न राहता वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवित असते. यात प्रामुख्याने शिवजयंती महोत्सव, वृक्षारोपण व संगोपन, स्वच्छता अभियान, तसेच कष्टकऱ्यांचा गौरव आदी विधायक कार्यांचा समावेश असतो. विशेषतः परिसरातील शाळा, महाविद्यालये आणि रुग्णालयांमुळे वर्दळ आणि महिलांसह तरुणींची सुरक्षा लक्षात घेऊन प्रतिष्ठानने लोकसहभागातून चौकाचौकांमध्ये ६४ पेक्षा अधिक आयपी (सीसीटीव्ही) कॅमेरे बसविले आहेत. हा पथदर्शी प्रकल्प स्थानिक पोलिसांना कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी उपयुक्त ठरला आहे. यंदाच्या गणेशोत्सवाच्या तयारीला आता शहरासह जिल्ह्यात विविध मंडळांकडून वेग आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'ऑपरेशन सिंदूर'च्या नायकाकडे राम मंदिराची जबाबदारी, निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा ट्रस्टचे नवे CEO

Dilip Walse Patil : डिंभे-माणिकडोह बोगद्याला विरोध कायम; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सकारात्मक भूमिका, 'थोडा वेळ देऊ, त्यानंतर पुढील रणनीती ठरवू'

Mumbai Sawantwadi Express : आजपासून मुंबई-सावंतवाडी रोजची एक्स्प्रेस धावणार! सीएसएमटी येथे मुख्यमंत्री फडणवीस दाखवणार हिरवा झेंडा

मुकेश अंबानींची रिलायन्स आता आईस्क्रीमही बनवणार, अवघ्या १० रुपयांत लाँच केले प्रॉडक्ट, दिग्गज कंपन्याची उडाली झोप

Gokulashtami 2026: मोरपीस ते बासरी! जन्माष्टमीआधी घरात 'या' ५ वस्तू आणणे मानले जाते अत्यंत शुभ; जाणून घ्या वास्तू नियमावली..

SCROLL FOR NEXT