नाशिक

जिल्हा बँजिल्हा बँकेसाठीजिल्हा बँकेसाठीकेसाठी

CD
जळगाव जिल्हा बँकेसाठी हजारांवर व्यक्तींचे ठराव --- सादर करण्याची मुदत संपली सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २ : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध कार्यकारी सोसायट्यांकडून संचालकपदासाठी एक हजार ७०२ व्यक्तींचे ठराव जिल्हा उपनिबंधक कार्यालयाला मिळाले आहेत. नावे पाठविण्यासाठी सोसायट्यांना बुधवार (ता. २)पर्यंत अखेरची मुदत होती. जळगाव जिल्हा बँकेची अधिकृत निवडणूक नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने विकास सोसायट्यांसह इतर सहकारी संस्थांकडून ठराव मागविले आहेत. बुधवारी सायंकाळपर्यंत विकास सोसायट्यांचे ८००, तर इतर सोसायट्यांचे ९०२, असे एकूण १,७०२ ठराव प्राप्त झाले. जिल्ह्यात ८७६ विकास सोसायट्या आहेत. रात्री उशिरापर्यंत तालुकानिहाय ठराव एकत्रित करण्याची प्रक्रिया सुरू होती. आलेले सर्व ठराव नाशिक विभागाच्या सहनिबंधकांकडे पाठविले जातील. तेथे छाननीनंतर अंतिम मतदारयाद्या तयार करून मतदानाची तारीख निश्चित केली जाईल. निवडणुकीचे निश्चित वेळापत्रक लवकरच स्पष्ट होईल. बँकेच्या अधिकृत संकेतस्थळानुसार, बँकेच्या सध्या २३७ शाखा असून, १२ लाखांहून अधिक ग्राहक आहेत. मागील पंचवार्षिक निवडणूक २१ नोव्हेंबर २०२१ ला झाली होती. त्यामुळे यंदाही नोव्हेंबर २०२६ मध्ये निवडणूक होण्याची शक्यता आहे. मात्र, निवडणुकीची अधिकृत तारीख अद्याप जाहीर झालेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: सरकारकडून जरांगेंच्या मागण्या मान्य! प्रसाद लाड यांच्या हस्ते घेतलं पाणी, सलाईनही घेणार

Bidkin Bribe Case : टिपर सुरू ठेवण्यासाठी पोलिस हवालदाराची महिन्याला एक हजारांची मागणी; पोलिस हवालदारावर एसीबीच्या जाळ्यात

Maratha Quota Protest: मराठा आरक्षणासाठी मंगळवेढ्यात ठिय्या आंदोलन; तोडगा न निघाल्यास ४ सप्टेंबरला मंगळवेढा बंदची हाक

IPS Officers Transfer : पोलिस विभागात मोठा फेरबदल; ८ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, 'या' सरकारचा तडकाफडकी निर्णय

'ऑपरेशन सिंदूर'चे नायक ते आता राम मंदिराचे नवे CEO, कोण आहेत निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा?

SCROLL FOR NEXT