धुळे ः टुडे २ साठी
--
फोटो क्रमांक ः 28575
धुळे ः अवैध व्यवसायांविरोधात प्रतिकात्मक अंत्ययात्रा आंदोलनात सहभागी युवा सेनेचे आंदोलक.
--
युवा सेनेकडून धुळ्यात
प्रतिकात्मक अंत्ययात्रा
अवैध व्यवसायांविरोधात आंदोलन
किंवा
आंदोलकांकडून प्रतिकात्मक अंत्ययात्रा
धुळ्यात अवैध व्यवसायांविरोधात युवा सेनेचे आंदोलन
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. २ ः शहरातील अवैध व्यवसायांप्रश्नी प्रशासन गप्प का, हा सवाल करत शिवसेना (उबाठा) पक्षप्रणीत युवा सेनेच्या आंदोलकांनी एका प्रतिकात्मक अंत्ययात्रेच्या माध्यमातून उदासीन शासकीय भूमिकेचा निषेध केला. आंदोलनाचा बुधवारी (ता. २) सलग सातवा दिवस होता.
आंदोलनाचे नेतृत्व करणारे युवा सेनेचे राज्य सहसचिव ॲड. पंकज गोरे, पंकज भारस्कर, संदीप चौधरी, ज्योती सोनवणे, मयूरी सोनवणे, सागर साळवे, सागर निकम, सूरज भावसार, मनोज गवळी, अजय चौधरी, बंटी गोरे, सोनू मुर्तडकर, स्वप्नील सोनवणे, विपुल भारस्कर, गोकुळ येलमामे, दर्शन खंबायत, सौरभ जवराळ, मुकेश जाधव, ज्ञानेश्वर देवरे, प्रवीण पाटील, सिद्धार्थ गोरे, अक्षय लाड उपस्थित होते.
ॲड. गोरे यांनी अवैध व्यवसायांचा प्रश्न गंभीर असूनही प्रशासन आंदोलनकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी पुढे येत नाही, नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केले जात असून, प्रशासनावर नेमका कुणाचा दबाव आहे, असा प्रश्न उपस्थित केला. अवैध व्यवसायांचा परिणाम सामाजिक वातावरण, तरुणाईवर होत आहे. त्यामुळे प्रशासनाने पारदर्शक भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी त्यांनी केली. आंदोलनाला जिल्हा कॉंग्रेस, जिल्हा वकील संघटना, दिव्यांग संघटना, आदिवासी संघटनेने पाठिंबा दिल्याचे आंदोलकांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.